५७ हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 01:07 PM2020-06-29T13:07:29+5:302020-06-29T13:07:34+5:30
जिल्ह्यातील ८५ हजार २५१ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.
अकोला : खरीप हंगामासाठी २६ जूूनपर्यंत जिल्ह्यातील ५७ हजार २४९ शेतकऱ्यांना ४७६ कोटी ८८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, जिल्ह्यातील ८५ हजार २५१ शेतकरी अद्याप पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना १ हजार १४० कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत ठरविण्यात आले आहे. गत २८ एप्रिलपासून जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे काम बँकांमार्फत सुरू करण्यात आले. त्यामध्ये उद्दिष्टाच्या तुलनेत २६ जूनपर्यंत जिल्ह्यात ५७ हजार २४९ शेतकºयांना ४७६ कोटी ८८ लाख रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित ८५ हजार २५१ शेतकºयांना अद्याप पीक कर्जाचा लाभ मिळाला नाही. जिल्ह्यात खरीप पेरण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पीक कर्ज मिळणार केव्हा, याबाबतची प्रतीक्षा कर्जाच्या लभापासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांकडून केली आहे.
खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू आहे. २६ जूनपर्यंत ५७ हजार २४९ शेतकºयांना ४७६ कोटी ८८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
- आलोक तारेणिया, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक