दुष्काळी मदत वितरित; पण शेतकऱ्यांना मिळेना लाभ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 03:27 PM2019-03-09T15:27:59+5:302019-03-09T15:28:04+5:30
मदतनिधी वितरणाची प्रक्रिया सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र पाचही तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी मदतीचा लाभ मिळाला नाही.
- संतोष येलकर
अकोला: जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील २ लाख १२ हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनामार्फत तीन हप्त्यात प्राप्त झालेला १३७ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला. मदतनिधी वितरणाची प्रक्रिया सुरू होऊन महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र पाचही तालुक्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी मदतीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे वितरित करण्यात आलेली मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी मंजूर करण्यात आलेल्या दुष्काळी मदतनिधीपैकी शासनामार्फत तीन हप्त्यांत १३७ कोटी ६१ लाख २४ हजार ५६० रुपयांचा मदतनिधी प्राप्त झाला. उपलब्ध मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी कायालयार्फत १ ते २६ फेबु्रवारीदरम्यान मदतीची रक्कम संबंधित पाच तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांकडून मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात आली; मात्र मदतीची रक्कम तहसील कार्यालयांना वितरित करण्याच्या प्रक्रियेस एक महिन्याचा कालावधी उलटून गेला असला तरी, दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकºयांना अद्याप दुष्काळी मदतीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे वितरित करण्यात आलेली मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
पाच तालुक्यांना वितरित अशी आहे मदतीची रक्कम!
तालुका रक्कम (लाखांत)
अकोला ३६,३७,९२,७४८
बार्शीटाकळी २२,६७,४८,६३८
तेल्हारा २१,१६,२५,११५
बाळापूर २८,०१,३७,६६७
मूर्तिजापूर २९,०८,२०,३९४
.............................................................
एकूण १३७,६१,२४,५६०
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त पाच तालुक्यातील शेतकºयांच्या मदतीसाठी शासनामार्फत तीन हप्त्यात प्राप्त १३७ कोटी ६१ लाख २४ हजार ५६० रुपयांची रक्कम तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आली. तहसील कार्यालयांमार्फत मदतीची रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यासाठी संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात आली. बँकांकडून किती शेतकºयांच्या खात्यात मदतीची किती रक्कम जमा करण्यात आली, यासंदर्भात सोमवारी संबंधित बँक अधिकाºयांची बैठक घेणार असून, आढावा घेण्यात येणार आहे.
-जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी
दुष्काळी मदतीची रक्कम अद्याप माझ्या बँक खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे मदतीचा लाभ मला मिळाला नाही.
- संजय मधुकरराव पागृत
शेतकरी, खरप, ता. अकोला.
दुष्काळी मदत शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी प्रशासनामार्फत वितरित करण्यात आली; परंतु माझ्या खात्यात अद्याप मदतीची रक्कम जमा झाली नाही.
- राजदत्त मानकर
शेतकरी, वाडेगाव, ता. बाळापूर.
दुष्काळी मदत शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे बहुतांश शेतकºयांना दुष्काळी मदतीचा लाभ अद्याप मिळाला नाही.
-शिवाजी भरणे
शेतकरी, रामगाव, ता. अकोला.