मूर्तिजापूर बाजार समितीमार्फत पाच हजार मास्कचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:18 AM2021-03-16T04:18:57+5:302021-03-16T04:18:57+5:30

गत वर्षापासून कोविड-१९ या विषाणूने जगात धुमाकूळ घातला आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्ण संख्येत झालेली घट लक्षात घेऊन ...

Distribution of five thousand masks through Murtijapur Market Committee | मूर्तिजापूर बाजार समितीमार्फत पाच हजार मास्कचे वाटप

मूर्तिजापूर बाजार समितीमार्फत पाच हजार मास्कचे वाटप

Next

गत वर्षापासून कोविड-१९ या विषाणूने जगात धुमाकूळ घातला आहे. ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्ण संख्येत झालेली घट लक्षात घेऊन प्रशासनाने अनलॉक प्रक्रियेत काही प्रमाणात सूट देण्यात आली होती. मात्र, पुन्हा फेब्रुवारी २०२१ पासून जिल्ह्यात कोरोना संसर्गामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यातून तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. या आनुषंगाने रिलायन्स फाउंडेशन यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी, हमाल, व्यापारी, अडते, कर्मचारी तथा पदाधिकारी यांना पाच हजार मास्कचे वाटप कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुहास तिडके यांचे हस्ते केले. यावेळी त्यांनी सर्व व्यापारी, हमाल, अडते, कर्मचारी यांना कोविड चाचणी करण्याचे आवाहन करीत सर्वांना सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला. याप्रसंगी रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक विलास सवाने, पत्रकार बांधव दिलीप बापू देशमुख, प्रा.अविनाश बेलाडकर, संजयभाऊ उमक, गोपाल ठक, अजय प्रभे बाजार समितीचे सचिव रितेश मडगे, बाजार समिती निरीक्षक प्रशांत कडू, अमोल मोहोडसह आदी व्यापारी, हमाल, अडते शेतकरी बांधव उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Distribution of five thousand masks through Murtijapur Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.