पोलीस कर्मचाऱ्यांना ग्लुकॉनडी चे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:16+5:302021-05-20T04:19:16+5:30
फाेटाे आहे ............... नाथ जाेगी वस्तीमध्ये धान्याचे कीट वाटप अकाेला : आदर्श संस्कार मंडळ व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त ...
फाेटाे आहे
...............
नाथ जाेगी वस्तीमध्ये धान्याचे कीट वाटप
अकाेला : आदर्श संस्कार मंडळ व रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाथजोगी वस्तीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील कुलकर्णी ,अकोला महानगर सेवा प्रमुख माणिक नालट , अकोला महानगर सहसेवा प्रमुख मकरंद देशपांडे, आदर्श संस्कार मंडळाचे शशांक जोशी व रिलायन्स फाऊंडेशनचे सचिन मातळे यांच्या हस्ते धान्य , किराणा किट वाटप करण्यात आले. याच बरोबर सॅनिटायझर, गुलकॉन D व लहान मुलांना बिस्कीटे वाटण्यात आली. संचालन प्रसाद पांडे यांनी केले. कार्यक्रमास राजू धोटे,नितीन गवळी अमोल नजरधने, संकेत काळे, वैकुंठ ढोरे,कैलास कदम ,विभाग सह प्रचारक दीपक बडमे,अकोला महानगर प्रचार प्रमुख महेश मोडक उपस्थित होते.
फाेटाे आहे
...........................
रामनवमी शाेभायात्रा समितीकडून धान्य वाटप
अकाेला : श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात अन्नधान्य आर्थिक मदत देण्यात आली. तसेच दुर्धर आजारासाठी हिंदू नववर्षाच्या श्री रामनवमी शोभायात्रा समितीने 112 जणांना मदतीचा हात दिला आहे यावेळी अध्यक्ष विलास अनासाने डॉक्टर अभय जैन ब्रिजमोहन चितलांगे अशोक गुप्ता अनिल मानधने अनिल थानवी गिरीराज तिवारी गिरीश जोशी घनश्याम गोयंका विक्रम गोयंका दीपक बजाज आदित्य अग्रवाल आदी उपस्थित हाेते.
...........................
म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन उपलब्ध करा
अकोला : म्युकरमायकोसिस या आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनची जिल्ह्यात टंचाई भासत असून यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे मागणी करून इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रहाची मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे या आजारासंदर्भात दंत तज्ज्ञ व नेत्रतज्ज्ञाची व्यवस्था करण्यात यावी व जनजागृती करण्यासाठी शासनाने सामाजिक संघटना यांचे सहकार्य घ्यावे, असे आवाहन त्यांनी पत्रात केले आहे
...........................
अहिल्यादेवींच्या जयंती निमित्त रुग्णांना मदत करा
अकोला : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त इतर कार्यक्रमांवर खर्च न करता रुग्णांना मदत करावी, असे आवाहन मल्हार ग्रुप व धनगर समाज युवक संघटनेचे रविराज घोगे यांनी केले आहे
...............................
वादळामुळे नुकसान, मदत जाहीर करा
अकोला : शहरामध्ये चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची टीन उडाल्यामुळे सर्वसामान्य गरिबांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे राज्य शासनाने व जिल्हा प्रशासनाने त्वरित सर्वे करून त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भाजपाच्यावतीने करण्यात आली आहे. अनेक नागरिकांचा या चक्रीवादळामुळे संसार उघड्यावर आला आहे. शासनाने त्वरित पाहणी करून त्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भाजपाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे
...............................
गोंधळी समाजाला आर्थिक साहाय्य देण्याची मागणी
अकोला - गोंधळी समाज गावोगावी जाऊन भिक्षा मागून कला सादर करून आपला उदरनिर्वाह करणारा समाज आहे. आता गाव बंदीमुळे त्यांना गावात जाता येत नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, तरी त्यांना शासनामार्फत आर्थिक साहाय्य म्हणून 5 हजार रुपये रोख रक्कम व सहा महिने पुरेल एवढी धान्य किराण्याची मदत देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र गोंधळी समाज विकास मंडळ अकोला जिल्हाध्यक्ष अमोल गीते यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. केंद्रीय अध्यक्ष डॉ श्यामसुंदरजी सोनोने, उपाध्यक्ष देवीदास पाचपोर, राजेंद्र गाडगे, सरचिटणीस राजेश सोनोने, गणेशराव इंगोले, कल्पना लाघे, जीवन पवार, नारायणराव सिंगनाथ, संजयजी पाचपोर, प्रफुलजी लाड,आदींनी निवेदन दिले आहे.
फाेटाे
.......................