‘फ्रंटलाईन वर्कर’सह रुग्णांना ‘ग्लुकोज डी’चे वाटप सुरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:18 AM2021-05-24T04:18:18+5:302021-05-24T04:18:18+5:30
अकोला: कोरोनाकाळात काम करणारे फ्रंटलाईन वर्कर आरोग्य कर्मचाऱ्यांसह रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने रिलायन्स फाउंडेशनच्या अकोला शाखेमार्फत जिल्हा परिषद ...
अकोला: कोरोनाकाळात काम करणारे फ्रंटलाईन वर्कर आरोग्य कर्मचाऱ्यांसह रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने रिलायन्स फाउंडेशनच्या अकोला शाखेमार्फत जिल्हा परिषद आरोग्य विभागाला ‘ग्लुकोज डी’ची १४ हजार ४०० पाकिटे शुक्रवारी उपलब्ध झाली. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ‘फ्रंटलाईन वर्कर’ आणि मधुमेह आजाराचे रुग्ण वगळता कोरोनाबाधित रुग्णांना ‘ग्लुकोज डी’ पाकिटांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी फ्रंटलाईन वर्कर म्हणून आरोग्य विभागाचे कर्मचारी काम करीत आहेत. कोरोनाकाळात फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि कोरोनाबाधित रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढावी, यादृष्टीने रिलायन्स फाउंडेशन अकोला शाखेमार्फत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला ‘ग्लुकोज डी’ची १४ हजार ४०० पाकिटे उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील आरोग्य कर्मचारी तसेच मधुमेह आजाराचे रुग्ण वगळता जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांना उपलब्ध ‘ग्लुकोज डी’ पाकिटांचे वाटप जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवळी यांनी सांगितले.