गरीब, गरजू कुटुंबांना धान्य किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:14 AM2021-05-28T04:14:58+5:302021-05-28T04:14:58+5:30

कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. व्यवसाय, उद्योग बंद पडले आहेत. किरकोळ विक्री बंद आहे. गावागावांमध्ये कोरोना महामारीने प्रचंड ...

Distribution of grain kits to poor, needy families | गरीब, गरजू कुटुंबांना धान्य किटचे वाटप

गरीब, गरजू कुटुंबांना धान्य किटचे वाटप

Next

कोरोनामुळे सर्व काही ठप्प झाले आहे. व्यवसाय, उद्योग बंद पडले आहेत. किरकोळ विक्री बंद आहे. गावागावांमध्ये कोरोना महामारीने प्रचंड दहशत पसरली आहे. हातमजुरी व रोजंदारी करणाऱ्या कुटुंबाचे हाल होत आहे. अशातच अकोला जिल्हा सेवा विभागातर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने जिल्ह्यात काही ठिकाणी गरीब, गरजू घटकांना काही धान्याच्या किट वितरण करण्यात आल्या. तालुक्यातील जनजाती वनवासी भागात व शहरातील चार वस्तीमध्ये ठिकाणी गरजू लोकांना १५० धान्याच्या किट सोबत ग्लुकाॅन डी, सॅनिटायझर आदी वस्तूंचे वितरण करण्यात आले. यावेळी संघाचे विभाग सहकार्यवाह अजय नवघरे, जिल्हा संघचालक ॲड. मोहन आसरकर, जिल्हा प्रचारक अंबादास साठे, नगर कार्यवाह आत्माराम नेमाडे, सहकार्यवाह वृषभ महल्ले, वामन जकाते, संजय शेळके, रोशन लावणे, राहुल शहाकार, विक्की गोठवळे नगरपालिकाचे आरोग्य विभागाचे चंडालिया, संजय बेलूरकर आदी उपस्थित होते.

Web Title: Distribution of grain kits to poor, needy families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.