‘भगवान ठग तुका म्हणे’ साहित्य पुरस्काराचे रविवारी वितरण

By admin | Published: January 23, 2016 02:02 AM2016-01-23T02:02:23+5:302016-01-23T02:02:23+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्याहस्ते होणार पुरस्कारांचे वितरण.

Distribution of 'Lord Thug Tuka Mune' Sahitya Award Sunday | ‘भगवान ठग तुका म्हणे’ साहित्य पुरस्काराचे रविवारी वितरण

‘भगवान ठग तुका म्हणे’ साहित्य पुरस्काराचे रविवारी वितरण

Next

बुलडाणा : मराठी साहित्य क्षेत्रात गेल्या १४ वर्षापासून दिल्या जाणार्‍या ह्यभगवान ठग तुका म्हणेह्ण साहित्य पुरस्काराचे वितरण २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बुलडाणा येथील सहकार सेतू अर्बन सभागृहात चंद्रपूर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी संम्मेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिध्द उर्दू-हिंदी साहित्यिक डॉ.गणेश गायकवाड हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून आमदार भाऊसाहेब फुंडकर, कवी, कादंबरीकार रमेश इंगळे उत्रादकर, डी. बी. जगतपुरीया यांची उपस्थिती लाभणार आहे. साहित्य व साहित्यिकांचा सन्मान व्हावा या उदात्त हेतूने आतापर्यंत १४३ साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. १ एप्रिल २0१४ ते ३१ मार्च २0१५ या कालावधीतील विविध साहित्य प्रकारांमध्ये ८८ प्रवेशिकांमधून ६ साहित्य कृतींची निवड भगवान ठग तुका म्हणे साहित्य पुरस्कार २0१५ साठी करण्यात आलेली आहे. कविता संग्रहासाठी दहा बाय दहा कु.मंजिरी भोयर, गझल संग्रहासाठी झेलून दुख माझे गेला खचून रस्ता प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (सागर), कथांग्रहासाठी रथ पंढरीनाथ रेडकर, आत्मकथा आंदकोळ किसन चव्हाण, कादंबरी नक्षलग्रस्त प्रतिमा इंगोले, वैचारिक संशोधन परिवर्तनवाद आणि दलित कविता डॉ.संजिवकुमार सोनवणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: Distribution of 'Lord Thug Tuka Mune' Sahitya Award Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.