१00 ट्रॅक्टरद्वारे महाप्रसादाचे वितरण

By admin | Published: January 20, 2017 02:20 AM2017-01-20T02:20:40+5:302017-01-20T02:20:40+5:30

हिवरा आश्रम येथे विवेकानंद जन्मोत्सवाची महाप्रसादाने सांगता.

Distribution of Mahaprasad through 100 tractors | १00 ट्रॅक्टरद्वारे महाप्रसादाचे वितरण

१00 ट्रॅक्टरद्वारे महाप्रसादाचे वितरण

Next

ओमप्रकाश देवकर
हिवरा आश्रम (बुलडाणा), दि. १९- सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याची गुरुवार, १९ जानेवारी रोजी महाप्रसाद वितरणाने सांगता झाली. यावेळी एकाच पंगतीत बसलेल्या लाखो भाविकांना १00 ट्रॅक्टरच्या मदतीने १५१ क्विंटल गव्हाचा पिठाच्या पुर्‍या आणि १0१ क्विंटल वांग्याची भाजीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.
हिवरा आश्रम येथे दरवर्षी स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. लाखो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करून महोत्सवाची सांगता करण्यात येते. यावेळी शुकदास महाराज, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, बबनराव भोसले, माधवराव जाधव, बबनराव तुपे, ऋषी जाधव, अँड. शैलेश देशमुख, आशाताई झोरे, मंदाकिनी कंकाळ, आशिष रहाटे, सीताराम ठोकळ, महंमद अली, अँड.किशोर धोंडगे, सिद्धेश्‍वर पवार, भरत सारडा, मनीष मांडवगडे, प्रा. मधू आढाव, समाधान म्हस्के, संतोष थोरहाते आदी उपस्थित होते. गुरुवारी दुपारी ४ वाजता स्वामी विवेकानंदांच्या जयघोषात आणि वाजतगाजत वाहनांद्वारे महाप्रसाद आणण्यात आला. त्यानंतर फटाक्याच्या आतषबाजीने महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली. तब्बल शंभर ट्रॅक्टरद्वारे व हजारो स्वयंसेवकांच्या सहाय्याने शिस्तबद्ध पद्धतीने पुरी-भाजीच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाप्रसादासाठी १५१ क्विंटल गव्हाचा पिठाच्या पुर्‍या आणि १0१ क्विंटल वांग्याची भाजी बनविण्यात आली होती. महाप्रसाद बनविण्यासाठी परिसरातील अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे संचालन हभप गजानन शास्त्री पवार यांनी केले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे सर्व विश्‍वस्त, सर्व शैक्षणिक विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Distribution of Mahaprasad through 100 tractors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.