टाकळी येथे कांदा चाळीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:14 AM2021-06-05T04:14:52+5:302021-06-05T04:14:52+5:30

---------------------------- विझोरा येथे १०९ जणांनी घेतली लस विझोरा : स्थानिक जिल्हा परिषद शाळेत कोविड-१९ चे लसीकरण शिबिर दि.४ जून ...

Distribution of onion chali at Takli | टाकळी येथे कांदा चाळीचे वाटप

टाकळी येथे कांदा चाळीचे वाटप

Next

----------------------------

विझोरा येथे १०९ जणांनी घेतली लस

विझोरा : स्थानिक जिल्हा परिषद शाळेत कोविड-१९ चे लसीकरण शिबिर दि.४ जून रोजी आयोजित केले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, शिबिरात ४५ वर्षांवरील वयोगटातील १०९ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

कान्हेरी सरप येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या विझोरा येथे कोविड-१९ लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ४५ वर्षे वयोगटातील १०९ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यावेळी सीएचओ डॉ. रवीकुमार नितनवरे, आरोग्य सेवक के.डी. भोलवनकर, आरोग्य सेविका व्ही.के. वानखडे, वानखेडे, आशा स्वयंसेविका रंजिता गवई, सुमित्रा गवई, छाया शिरसाट, पुष्पा वानखेडे, अंगणवाडी सेविका निर्मला वानखेडे, सविता देऊळकर, आदींनी परिश्रम घेतले. यावेळी सरपंच आर. बी. गवई, उपसरपंच अनिल चौधरी, तलाठी ऊर्मिलाताई गव्हाळे, ग्रामसेविका जया माणिकराव, ग्रामपंचायत सदस्य उमेश गवई, दिनकर गवई उपस्थित होते. (फोटो)

---------------------

‘घरचे सोयाबीन पेरणी करताना बीज प्रक्रिया करावी!’

बोरगाव वैराळे : यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांनी घरचे सोयाबीन बियाणे वापरण्यावर भर द्यावा; परंतु घरचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी उगवण क्षमता तपासणी करण्यासोबत बीज प्रक्रिया केल्यानंतर पुरेसा ओलावा जमिनीत असल्यावरच पेरणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने यांनी केले.

शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसू नये, म्हणून बाळापूर तालुका कृषी विभागाने गावागावात शेतकरी जनजागृतीचे कार्यक्रम सुरू केले आहेत. या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील अंत्री येथे घरचे सोयाबीन पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी उगवण क्षमता तपासणी केल्यानंतर बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असल्याचे तालुका कृषी अधिकारी नंदकुमार माने व कृषी सहायक इंगळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी सरपंच संदीप वाघोडे, उपसरपंच आश्विन इंगळे, अक्षय वानखडे, विजय आवळे, गणेश फुंडकर, प्रमोद वाघोडे, अनिल इंगळे, श्रीकृष्ण साबळे आदींसह शेतकरी उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Distribution of onion chali at Takli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.