रामप्रसादाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:19 AM2021-05-08T04:19:04+5:302021-05-08T04:19:04+5:30
‘पीएम आवास’चा तिढा निकाली निघेना! स्थायी समिती सभागृहात याेजनेवर खलबते अकाेला: शहरात केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास याेजनेतील पात्र लाभार्थी ...
‘पीएम आवास’चा तिढा निकाली निघेना!
स्थायी समिती सभागृहात याेजनेवर खलबते
अकाेला: शहरात केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास याेजनेतील पात्र लाभार्थी हक्काच्या घरापासून वंचित असल्याचे चित्र आहे. अनेकांनी घरे मंजूर झाल्यामुळे बांधकामाला सुरूवात केली. यादरम्यान, हप्ते थकीत असल्याने लाभार्थ्यांवर संकट काेसळल्याची परिस्थिती आहे.
...................
मनपात साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा
अकाेला: काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव कायम असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत मनपाकडून अकाेलेरांना साेशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत सातत्याने आवाहन केले जात असतानाच, खुद्द मनपाच्या विविध कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून साेशल डिस्टन्सिंगला खाे दिल्याचे चित्र मंगळवारी पाहावयास मिळाले.
...................
पाणीपुरवठा याेजनेची कामे रखडली
अकाेला : शहरात ‘अमृत’अभियानअंतर्गत पाणीपुरवठा याेजना निकाली काढल्या जात असून याेजना अंतिम टप्प्यात असली तरी जलप्रदाय विभागाच्या दुर्लक्षामुळे याेजनेचा बाेजवारा उडाल्याचे चित्र आहे. विविध प्रभागांतील कामे अर्धवट स्थितीत आहेत.
...............
नायगाव परिसरात पाणीटंचाइ
अकोला:‘अमृत’योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणालीत जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नळांना मीटर लावले जात आहे. दुसरीकडे प्रभाग १मधील नायगाव परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़
................