रिलायन्स फाउंडेशनतर्फे गरजूंना रेशन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:14 AM2021-06-01T04:14:43+5:302021-06-01T04:14:43+5:30

कोरोनाच्या काळात अडचणीत आलेले गरजू, बेरोजगार यांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. यासाठी रिलायन्स फाउंडेशनचे आयोजक विलास सवाने व ...

Distribution of rations to the needy by Reliance Foundation | रिलायन्स फाउंडेशनतर्फे गरजूंना रेशन वाटप

रिलायन्स फाउंडेशनतर्फे गरजूंना रेशन वाटप

Next

कोरोनाच्या काळात अडचणीत आलेले गरजू, बेरोजगार यांना रेशन किटचे वाटप करण्यात आले. यासाठी रिलायन्स फाउंडेशनचे आयोजक विलास सवाने व चेतना ऑरगॅनिक संस्थेचे राज्य समन्वयक यांच्यामार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विधवा महिला, तसेच हातावर पोट असलेल्या गरीब कामगार, बेरोजगार, त्यांना मोठा फटका बसला आहे. या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी सामाजिक दृष्टिकोनातून या रेशन किटचे वाटप करण्यात आले. यावेळी चेतना ऑरगॅनिक संस्थेचे राज्य समन्वयक राहुल बोळे, गोपाल ठक, अतुुल डाखोरे, रूपेश बंगाळे, वैभव मानकर, मधुकर निलखन, मिलिंद जवके, अक्षय देशमुख उपस्थित होते.

Web Title: Distribution of rations to the needy by Reliance Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.