श्रीराम नवमी शोभायात्रा समितीतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीनचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:16 AM2021-05-29T04:16:02+5:302021-05-29T04:16:02+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अर्चना मसने होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार गोवर्धन शर्मा, विलास अनासाने, डॉ.अभय जैन, ब्रिजमोहन चितलांगे, आशादेवी ...

Distribution of sewing machines to needy women by Shriram Navami Shobhayatra Samiti | श्रीराम नवमी शोभायात्रा समितीतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीनचे वितरण

श्रीराम नवमी शोभायात्रा समितीतर्फे गरजू महिलांना शिलाई मशीनचे वितरण

Next

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर अर्चना मसने होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार गोवर्धन शर्मा, विलास अनासाने, डॉ.अभय जैन, ब्रिजमोहन चितलांगे, आशादेवी गोयनका, अंशुल गुप्ता, अर्चना शर्मा, अनिता मुरारका, श्वेता गुप्ता, आरती शर्मा, पुष्पा वानखडे, मनिषा भुसारी आदी होते.

यावेळी आ.गोवर्धन शर्मा यांनी गुजरात अंबुजा व श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या वतीने ४० महिलांना आणखी शिलाई मशीन देण्याचे अभिवचन दिले. यावेळी अंशुल गुप्ता व मोहन गुप्ता यांचा सुहासिनी धोत्रे यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक गिरीराज तिवारी यांनी तर आभार प्रदर्शन अनिल मानधने यांनी केले.

फोटो:

या गरजू महिलांना दिल्या शिलाई मशीन

निधी नंदकिशोर कामले, रूपाली गजानन दहाये, श्रीमती कांताताई शर्मा, मीराताई सुरेश खैरे, माया गजेंद्र तायडे, रेखा राम बडगे, निर्मल संजय बहुराशी, संजना चित्रावर, शोभा कीर्तिवार, सावित्री निमकंडे, मुन्नी पप्पू पांडे यांना शिलाई मशीन देण्यात आल्या.

Web Title: Distribution of sewing machines to needy women by Shriram Navami Shobhayatra Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.