अकोल्यातील तीन केंद्रावरून हजारो रोपांचे वितरण
By admin | Published: July 4, 2017 08:52 PM2017-07-04T20:52:58+5:302017-07-04T20:52:58+5:30
वन विभागाच्या रोप आपल्या दारी मोहिमेला प्रतिसाद : सामाजिक संस्थांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यात चार कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प वन विभागाने घेतला असून त्या अंतर्गत वन विभागाने रोपे आपल्या दारी मोहिम राज्यात सुरू केली आहे. या मोहिमेला अकोल्यात चांगला प्रतिसाद मिळत असून शहरातील तीन प्रमुख केंद्रावरून हजारो रोपांचे वितरण केले जात आहे. वन विभागासह अकोल्यातील विविध सामाजिक संघटनांच्या पुढाकारात ही मोहीम यशस्वी होत आहे.
शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधीकॅम्प आणि प्राप्तीकर कार्यालयाजवळच्या वनविभाग कार्यालयासमोर तीन ठिकाणी स्टॉल लावले गेले आहेत.वन विभागाच्या एका स्टॉलवरून मंगळवारी सायंकाळपर्यत २८०० रोपांपैकी १८ रोपांचे वितरण झाले. एक हजार रोपांचे वितरण उद्यापर्यंत होणार आहे. ही आकडेवारी एका स्टॉलची आहे, अशा तीन स्टॉलची आकडेवारी काढली असता हजारोंच्या घरात जाते. वनविभाग आणि निसर्गासाठी काम करणार्या सामाजिक संस्थांनी अकोल्यात पावसाळ््यात हजारो वृक्षाचे वाटप केले असून यामधे गुलमोहर, शेवगा, जासवंत आणि दोन अशा पाच जातीची रोपे वितरीत होत आहेत. अकोल्यातील निसर्ग संवर्धन संघाचे नऊ पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत. ना नफा ना तोटा या धोरणात ही रोपे वितरीत होत असून अकोलेकरांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला आहे.