व्याज परतावा योजनेत दोन लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:15 AM2021-06-01T04:15:08+5:302021-06-01T04:15:08+5:30

अकोला: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेंतर्गत ...

Distribution of tractors to two beneficiaries under interest refund scheme | व्याज परतावा योजनेत दोन लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

व्याज परतावा योजनेत दोन लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण

Next

अकोला: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेंतर्गत दोन लाभार्थ्यांना व्यावसायिक ट्रॅक्टरचे वितरण सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला यांच्यातर्फे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत दोन लाभार्थ्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते लाभार्थींना व्यावसायिक ट्रॅक्टरच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र द. ल. ठाकरे, जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील महामंडळ रोहित बारस्कर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

......................फोटो..............................

Web Title: Distribution of tractors to two beneficiaries under interest refund scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.