अतिगंभीर रुग्णांसाठी शिवसेनेकडून व्हेंटिलेटरचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:21 AM2021-05-25T04:21:01+5:302021-05-25T04:21:01+5:30
अकोला : कोरोना विषाणूची लागण झालेल्या अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे. त्यांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याची मागणी ...
अकोला : कोरोना विषाणूची लागण झालेल्या अनेक रुग्णांची प्रकृती गंभीर होत आहे. त्यांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. पर्यावरण मंत्र्यांनी ही मागणी तातडीने मंजूर करीत पाच व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिल्याची माहिती सोमवारी जिल्हा नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नितीन देशमुख यांनी दिली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत या व्हेंटिलेटरचे वितरण करण्यात आले.
यावेळी आ. देशमुख म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच जिल्हा स्त्री रुग्णालय व मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरची कमतरता असल्याचा मुद्दा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे उपस्थित केला होता. व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचविता येतील. ही बाब सांगितल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी तातडीने पाच व्हेंटिलेटर पाठवून दिले. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्यचिकित्सक राजकुमार चव्हाण , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बंडूभाऊ ढोरे, जि. प.चे गटनेता गोपाल दातकर, मूर्तिजापुर तालुका प्रमुख अप्पू तिडके, अकोट तालुकाप्रमुख दिलीप बोचे, तालुकाप्रमुख विकास पागृत, शहरप्रमुख (पूर्व) अतुल पवनीकर, शहर प्रमुख तथा मनपा गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, उपशहर प्रमुख केदार खरे, अभिषेक खरसाडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख राहुल कराळे, अविनाश मोरे, प्रमोद धर्माळे, विशाल कपले, योगेश गीते, आदी उपस्थित होते.
‘जीएमसी’, मूर्तीजापूर रुग्णालयाला वाटप
पाच व्हेंटिलेटर पैकी तीन व्हेंटिलेटर जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच दोन व्हेंटिलेटर मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी देण्यात आले. या व्हेंटिलेटरचा तातडीने वापर सुरू करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय आरोग्य यंत्रणेचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.