पीक विम्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी केली विचारणा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 03:20 PM2019-07-02T15:20:06+5:302019-07-02T15:20:18+5:30
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या महसूल मंडळातील शेतकरी आणि अधिकाºयांची बैठक घेऊन चर्चा केली आणि यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली.
अकोला: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीत सर्वच महसूल मंडळातील पिकांचे नुकसान झाले असताना, अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभातून वगळण्यात आले. त्यामुळे या प्रश्नावर सोमवारी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या महसूल मंडळातील शेतकरी आणि अधिकाºयांची बैठक घेऊन चर्चा केली आणि यासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली.
गतवर्षीच्या खरीप हंगामात कुरणखेड महसूल मंडळांतर्गत गावांमधील शेतकºयांनी मूग, उडीद, तूर, ज्वारी, सोयाबीन व कपाशी इत्यादी पिकांचा विमा काढला आहे; परंतु जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळ असल्याने आणि सर्वच महसूल मंडळातील शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले असताना अकोला तालुक्यातील कुरणखेड महसूल मंडळाला पीक विम्याच्या लाभासाठी वगळण्यात आले. दुष्काळी परिस्थितीत शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले असताना पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळातील शेतकºयांना वगळण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात जाब विचारून संबंधित अधिकाºयावर कारवाई करण्यात यावी आणि पीक विम्याच्या लाभासाठी कुरणखेड महसूल मंडळाला समाविष्ट करण्याची मागणी करीत, कुरणखेड महसूल मंडळातील शेतकºयांनी गत २८ जून रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या कक्षात ठिय्या दिला होता. त्यानुषंगाने या प्रश्नावर १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कुरणखेड महसूल मंडळातील शेतकरी व संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली. शेतकºयांसोबत चर्चा करून, कुरणखेड तसेच चोहोट्टा बाजार महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या लाभासाठी कसे अपात्र ठरले, कोणता निकष लावण्यात आला, यासंदर्भात माहिती घेत, जिल्हाधिकाºयांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना विचारणा केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, प्रकल्प उपसंचालक अरुण वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार यांच्यासह कोठारी येथील सरपंच महेंद्र इंगळे, दुधलमचे सरपंच रवींद्र पंडित, पातूर नंदापूरचे सरपंच अमित पाटील, कातखेडचे सरपंच गोरसिंग राठोड, देवळीच्या उपसरपंच वैशाली सदांशिव, माजी सरपंच संजय निलखन, डॉ. अशोक गाडगे, विकास सदांशिव, सचिन लाखे, देवानंद सदांशिव, सतीश चोपडे, राजेश लाखे, सैय्यद सालार, सुखदेव दामोदर, श्रीधर मोरे, सागर राऊत, विठ्ठल सारसे, प्रवीण वाहुरवाघ व कुरखेड महसूल मंडळातील विविध गावांमधील शेतकरी उपस्थित होते.