जिल्हाधिकाऱ्यांनी केले महाश्रमदान
By admin | Published: April 21, 2017 01:57 AM2017-04-21T01:57:13+5:302017-04-21T01:57:13+5:30
पिंजर- महागाव येथे मंगळवारी सकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदानास सुरुवात केली.
पिंजर : सत्यमेव जयतेच्या वॉटर कप स्पर्धेच्या सत्रातील ग्राम महागाव (मारखेड)ने सहभाग नोंदविला असून, त्या पृष्ठभूमीवर १८ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह परिसरातील लोकांनी महाश्रमदान केले.
महागाव येथे मंगळवारी सकाळी ६ वाजता जिल्हाधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदानास सुरुवात केली. एक एक श्रमदाता वाढत जाऊन १० वाजेपर्यंत सुमारे २००० नागरिकांनी श्रमदानामध्ये सहभाग नोंदवून वन विभागाच्या जागेमध्ये सलग समतल सर (टीसीपी) खोदले. यामध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, तहसीलदार राजेंद्र जाधव, तालुका कृ षी अधिकारी सुरेश इवनाते, पंचायत समितीतील चांदुरकर, मुंढे यांच्यासह वन विभाग, महसूल विभाग, कृ षी विभागाचे कर्मचारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी आदींनी सहभाग नोंदविला. दरम्यान, जनुना सर्कलच्या जिल्हा परिषद सदस्य गीता राठोड, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रकाश उपाध्ये, माजी सभापती अशोक राठोड, रमेश वानखडे, शिवसेना तालुका प्रमुख गजानन मानकर व परिसरातील सरपंच, उपसरपंच व पोलीस पाटील आदींनी श्रमदान केले.