कुरुम आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी, सीईओंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:33 AM2021-03-04T04:33:52+5:302021-03-04T04:33:52+5:30
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, मूर्तिजापूर पं. स. गटविकास अधिकारी बाळासाहेब ...
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, मूर्तिजापूर उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, मूर्तिजापूर पं. स. गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर कराळे, डॉ. अमित कावरे आदी होते.
यावेळी प्रा. आ. केंद्र कुरुमच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय आरोग्य कक्ष, संगणक कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, औषधी कक्ष, इंजेक्शन कक्ष, महिला व पुरुष शौचालय, आरोग्य-सभा कक्ष, आंतररुग्ण कक्ष १ व २, नवजात शिशू आगमन कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, औषधी भंडार कक्षाची पाहणी केली. यावेळी प्रा. आ. केंद्राचे साथरोग अधिकारी संजय घाटे यांनी गेल्या २०२० पासून कोविड १९ या कार्यात अतिशय प्रामाणिकपणे सहभागी होऊन या कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडली, याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काैतुक केले.
यावेळी सरपंच अतुल वाठ, उपसरपंच इम्रान खान, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. स्नेहलता अरबट, साथरोग अधिकारी संजय घाटे, औषध निर्माण अधिकारी मंजुश्री मार्गे, अधिपरिचारिका रिटा घनबहादूर, संगीता पुरी, एम.व्ही.सोळंके, कनिष्ठ सहाय्यक कैलास बागडे, मो. हुसेन, गटप्रवर्तक ए.डी.गारपवार, परिचर निलेश बायस्कर, मो.वाजिद, पंजाब सरदार, शोभा अंभोरे उपस्थित होते.
फोटो: