बार्शीटाकळी केंद्रावरील स्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

By admin | Published: April 28, 2017 02:00 AM2017-04-28T02:00:08+5:302017-04-28T02:00:08+5:30

बार्शीटाकळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह अचानक भेट देऊन मोजमाप न झालेल्या तुरीबाबत माहिती घेतली.

District Collector has reviewed the situation at the Barshitakali center | बार्शीटाकळी केंद्रावरील स्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

बार्शीटाकळी केंद्रावरील स्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

Next

सायखेड : जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी २७ एप्रिल रोजी सकाळी अचानक बार्शीटाकळीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यांच्या अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह अचानक भेट देऊन मोजमाप न झालेल्या तुरीबाबत माहिती घेतली. याबाबत सविस्तर आढावा घेऊन संबंधित यंत्रणेकडून नाफेड केंद्रावर विक्रीसाठी आलेल्या व खरेदी बंद झाल्यानंतर मोजमापाच्या प्रतीक्षेत असलेल्या तुरीचे पंचनामे करण्याचा आदेश दिला.
जिल्हाधिकारी पांडेय हे रु जू झाल्यानंतर गुरुवारी प्रथमच बार्शीटाकळीत दाखल झाले. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी महसूल पंचायत, कृषी विभागासह कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी-विक्री संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
--

Web Title: District Collector has reviewed the situation at the Barshitakali center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.