जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध विभागांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:20 AM2021-07-27T04:20:13+5:302021-07-27T04:20:13+5:30
अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध विभागांच्या कार्यालयांना भेट देऊन, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सोमवारी पाहणी केली. या ...
अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध विभागांच्या कार्यालयांना भेट देऊन, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी सोमवारी पाहणी केली. या वेळी त्यांनी कार्यालयांतील संबंधित कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत माहिती घेतली. जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर जिल्हाधिकारी अरोरा यांनी पहिल्यांदाच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपविभागीय कार्यालय, पुरवठा विभाग, जिल्हा कोषागार कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय, महिला व बाल विकास विभाग, समाजकल्याण विभाग, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार केंद्र, महिला व बाल विकास विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सूचना व प्रसारण विभाग, अभिलेख कक्ष, जिल्हा माहिती कार्यालय व निवडणूक कार्यालय आदी विभागांच्या कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली. संबंधित कार्यालय प्रमुखांकडून विभागाच्या कामकाजाचे स्वरूप, रचना, कर्मचारी संख्या आदींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. तसेच कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कामकाजाची माहिती घेतली. या वेळी त्यांच्यासमवेत प्रभारी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
..................फोटो........................