मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 04:14 PM2020-09-21T16:14:32+5:302020-09-21T16:14:43+5:30

धडक मोहिम राबवून १० व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही केली.

District Collector takes action against those who do not use masks | मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई

Next

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी होत असते. या ठिकाणी गर्दी करणारे मास्क न वापरता सर्रास ईकडे-तिकडे फिरत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंन्द्र पापळकर यांना आढळून आले. अशा व्यक्तींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंन्द्र पापळकर यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख व तहसिलदार विजय लोखंडे यांच्या समवेत धडक मोहिम राबवून १० व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही केली. कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी मास्क चा वापर, हाताची स्वच्छता व सामाजिक अंतर पाळणे महत्वाचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंन्द्र पापळकर यांनी केंले. येत्या आठवडयात मोठया प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्हयात काही आठवड्यापासून  मोठया प्रमाणात कोविड-१९ रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी लोकांनी तसेच घरातून बाहेर निघतांना मास्क चा वापर करावा अन्यथा अशा व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल तरी आपले कुटुंब आपली जबाबदारी समजून लोकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: District Collector takes action against those who do not use masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.