दूषित पाणीपुरवठय़ाचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत

By admin | Published: May 25, 2014 12:44 AM2014-05-25T00:44:14+5:302014-05-25T00:49:04+5:30

दूषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले असून तीन ते चार दिवसानंतर अहवाल अपेक्षीत

In the District Health Laboratory, contaminated water supply samples | दूषित पाणीपुरवठय़ाचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत

दूषित पाणीपुरवठय़ाचे नमुने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत

Next

अकोला - शहरातील काही भागात बुधवारी व गुरुवारी करण्यात आलेला पाणीपुरवठा दूषित असल्याने या दूषित पाण्याचे नमुने मनपाच्या आरोग्य विभागाने जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहेत. शहराच्या विविध भागातील २0 ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तीन ते चार दिवसानंतर या नमुन्याचा अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन कान्हेरीनजीक फुटल्यामुळे आठ दिवसांनंतर मनपाच्या जलप्रदाय विभागाद्वारे करण्यात आलेल्या पाणीपुरवठय़ात क्लोरीनचे प्रमाण भयंकर होते. यासोबतच महान येथे पाण्याचे नमुने न घेता तसेच कुठलीही तपासणी न करताच पाणीपुरवठा करण्यात आला असून, ज्यांनी या पाण्याचा उपयोग केला, त्या भागात ३५ दिवसांनंतर कावीळचा उद्रेक होण्याची भीतीही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ज्या भागात पाणीपुरवठा करण्यात आला, त्या भागातील पाणी नमुने तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

Web Title: In the District Health Laboratory, contaminated water supply samples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.