ऑनलाइन सात-बारा उपक्रमात जिल्हा दुसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 02:07 AM2017-11-22T02:07:08+5:302017-11-22T02:07:42+5:30

अकोला : जिल्हय़ातील शेतकर्‍यांना सात-बारा सहजपणे उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने राबवलेला ऑनलाइन सात-बारा उपक्रम राज्यात कौतुकाचा ठरला आहे.

District II in Seven-Twelve Program Online | ऑनलाइन सात-बारा उपक्रमात जिल्हा दुसरा

ऑनलाइन सात-बारा उपक्रमात जिल्हा दुसरा

googlenewsNext
ठळक मुद्देप्रधान सचिवांच्या हस्ते जिल्हय़ाचा पुण्यात गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ातील शेतकर्‍यांना सात-बारा सहजपणे उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने राबवलेला ऑनलाइन सात-बारा उपक्रम राज्यात कौतुकाचा ठरला आहे. या उपक्रमात जिल्हय़ाला राज्यात द्वितीय स्थान मिळाले आहे. त्याबद्दल पुण्यातील यशदामध्ये आयोजित कार्यक्रमात महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजेश खवले यांच्याकडे प्रमाणपत्र देऊन जिल्हय़ाचा गौरव केला.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदशर्नाखाली जिल्हय़ातील सर्व सात-बाराचे संगणकीकरण करण्यात आले. तसेच सात-बारा संगणकीकरण करण्यासाठी जिल्हय़ातील १0३६ गावांचे डिक्लेरेशन-३ ही प्रक्रियाही यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. ही बाब जिल्हय़ासाठी भूषणावह ठरली आहे. 
दैनंदिन कार्यपद्धतीत सुलभता व पारदर्शकता आणण्यासाठी प्रशासनाकडून संगणकीय प्रणालीचा वापर होत आहे. त्यासाठी जिल्हय़ात ३ लाख ५३ हजार ७९३ सात-बारांचे संगणकीकरण झाले आहे. जिल्हय़ात पूर्णपणे ऑनलाइन सात-बारा वाटप केले जात आहे. शेतकर्‍यांना वर्षभर ३६५ दिवस सात-बारा मिळत आहे. हा उपक्रम लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी अकोला तालुक्यातील चांदुर येथे शेतकर्‍यांच्या वेशभूषेत जनजागृती केली. 
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते संगणकीकृत सात-बाराचे वाटप करून उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. उपक्रमाचे नोडल अधिकारी म्हणून राजेश खवले यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात अकोलाबरोबरच उस्मानाबाद आणि वाशिम या तीन जिल्हय़ात ऑनलाइन सात-बाराचे काम पूर्ण झाले आहे. जिल्हय़ातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील रानडे व राऊत यांनी परिश्रम घेतले. 
-

Web Title: District II in Seven-Twelve Program Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onlineऑनलाइन