कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 02:10 PM2020-01-10T14:10:06+5:302020-01-10T14:10:12+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश आहे.

District level committee constituted for implementation of loan waiver scheme! | कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित!

कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ८ जानेवारी रोजी दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश आहे.
शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. कर्जमाफी योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला. जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील या जिल्हास्तरीय समितीमध्ये सदस्य म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, व्यापारी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक आणि सदस्य सचिव म्हणून जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) इत्यादी सात अधिकाºयांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय समितीमधील सदस्यांनी कर्जमाफी योजना जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी समितीमधील सदस्य अधिकाºयांना दिल्या आहेत.

बँक खाते आधार ‘लिंक’ करण्याच्या कामाचा आज आढावा!
 कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) नसलेल्या शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शेतकºयांचे बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवार, १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाºयांसह जिल्हा उपनिबंधक व जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Web Title: District level committee constituted for implementation of loan waiver scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.