जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती शुक्रवारी सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:18 AM2021-03-18T04:18:30+5:302021-03-18T04:18:30+5:30
----------------------------------------------------------- वृद्धांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती-संस्थांना पुरस्कार अकोला : ज्या व्यक्ती व संस्था ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करतात त्यांना ...
-----------------------------------------------------------
वृद्धांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती-संस्थांना पुरस्कार
अकोला : ज्या व्यक्ती व संस्था ह्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करतात त्यांना केंद्र शासनाच्यावतीने एकात्मिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त १ ऑक्टोबर रोजी सन्मानित करण्यात येते. त्यासाठी संबंधित व्यक्ती व संस्थांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अकोला येथे शनिवार, २० पर्यंत अर्ज करावा. अर्जाचा नमुना सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय अकोला येथे उपलब्ध आहे. इच्छुक व्यक्ती व संस्थांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------
प्रस्ताव सादर करण्यास २६ पर्यंत मुदतवाढ
अकोला : राज्याच्या युवा धोरणानुसार जिल्हास्तरावर युवक/युवती व एक संस्था यांना पुरस्कार देण्यात येतात. त्याअनुषंगाने सन २०१९-२० व २०२०-२१ या दोन वर्षांसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. हे प्रस्ताव पाठविण्यासाठी आता शुक्रवार, २६ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी सांगितले. पुरस्कारासंदर्भात सविस्तर माहिती व अटी, शर्तींसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला येथे संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------
जि. प. व पं. स.चे सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी मंगळवारी सोडत
अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १४ जागांचे व सातही पंचायत समित्याच्या २८ जागांचे सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित करण्याकरिता मंगळवार, २३ मार्च रोजी सोडत काढण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक विभागाव्दारे सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषदेकरिता सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी २३ रोजी तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी सबंधीत तहसिलदार यांनी मंगळवार २३ रोजी सोडत घ्यावी. तसेच अंतिम आरक्षण सुधारणा आदेशाच्या स्वरुपात शासन राजपत्रात बुधवार, २४ मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
---------------------------------------------------------
सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे धान्य वाटप
अकोला : जिल्ह्याकरिता मार्च २०२१ करिता लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य/नियंत्रित साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तुचे वाटप परिमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली आहे. प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी गहु, तांदूळ, ज्वारी व अंत्योदय योजना गहू, तांदूळ, मका, ज्वारी तसेच एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता गहु, तांदूळ, साखर वितरण करण्यात येणार आहे.