संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पाटखेड ग्रामपंचायतला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:17 AM2021-03-22T04:17:33+5:302021-03-22T04:17:33+5:30

मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या आदेशानुसार जिल्हा स्तरीय समितीने अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातील स्पर्धेत समाविष्ट असणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी ...

District level first award to Sant Gadge Baba Gram Swachhta Abhiyan Patkhed Gram Panchayat | संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पाटखेड ग्रामपंचायतला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पाटखेड ग्रामपंचायतला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार

googlenewsNext

मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्या आदेशानुसार जिल्हा स्तरीय समितीने अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यातील स्पर्धेत समाविष्ट असणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी अंती ग्रामपंचायत पाटखेडला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला.

सदर समितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) विलास मरसाळे, विस्तार अधिकारी (शिक्षण) पिरमवार, मनुष्य विकास सल्लागार प्रवीण पाचपोर, पाणी गुणवत्ता सल्लागार कु ममता गणोदे यांचा समावेश होता.

सदर समितीसमवेत राजंदा सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. गणेश बोबडे उपस्थित होते.

बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर काळपांडे, सहायक गटविकास अधिकारी रमेश चव्हाण, विस्तार अधिकारी दीपक इंगळे, गट समन्वयक सुरेश मानकर, सतीश ठोंबरे यांनी गावाच्या विकासाकरिता वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे प्रयत्न केले.

गावामध्ये सरपंच महादेवराव श्रीराम मानकर, सचिव राजेश वासुदेव बंड, उपसरपंच वसंत वनारे, ग्रामपंचायत सदस्य राजू खंडारे, संदीप जानोकार, पुष्पा गोपाल नेवाल, रजनी विनोद नागे, मीना सुरेश खंडारे, रुक्मिणीताई महादेवराव मानकर, पदाधिकारी व गावकरी यांनी गावात स्वच्छतेविषयक विविध उपक्रम राबविले.

यावेळी पाटखेडचे सरपंच महादेवराव मानकर, उपसरपंच वसंता वनारे, सचिव राजेश बंड, ग्रा.पं.सदस्य, माजी पोलिस पाटील समाधान खंडारे, गजानन कुचर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक व गावकऱ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. (तालुका प्रतिनिधी )

Web Title: District level first award to Sant Gadge Baba Gram Swachhta Abhiyan Patkhed Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.