४५ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन बुधवारपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 02:05 PM2020-01-07T14:05:43+5:302020-01-07T14:05:49+5:30
८, ९ व १0 डिसेंबर रोजी खंडेलवाल ज्ञानमंदिर, गोरक्षण रोड येथे ४५ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
अकोला : राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, खंडेलवाल ज्ञानमंदिराच्या वतीने ८, ९ व १0 डिसेंबर रोजी खंडेलवाल ज्ञानमंदिर, गोरक्षण रोड येथे ४५ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खंडेलवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गोपाल खंडेलवाल राहतील. प्रमुख अतिथी म्हणून राज्य विज्ञान शिक्षण संस्थेचे संचालक रवींद्र रमतकर, शिक्षण विभागाचे सहायक संचालक तेजराव काळे, ज्ञानप्रकाश खंडेलवाल, डॉ. पद्मजा महाजन, प्रमोदकुमार खंडेलवाल, दिलीप खंडेलवाल, प्राचार्य मुग्धा कळमकर राहतील. १0 जानेवारी रोजी दुपारी विज्ञान प्रदर्शनाचा समारोप होईल. विज्ञान प्रदर्शनामध्ये शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान हा विषय आहे.
या विषयावर विद्यार्थी प्रतिकृती सादर करतील. समारोपीय कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर, डाएटचे प्राचार्य डॉ. समाधान डुकरे, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, डॉ. वैशाली ठग, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, जिल्हाध्यक्ष बळीराम झामरे, माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष दिलीप कडू उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)