स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे जिल्हा ग्रंथालय ठरले दीपस्तंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 03:39 PM2018-10-26T15:39:28+5:302018-10-26T15:40:18+5:30

स्पर्धा परीक्षेचे महागडे क्लास लावण्याइतपत परिस्थिती नसणाºया विद्यार्थ्यांसाठी जिल्हा ग्रंथालय दीपस्तंभ ठरत आहे.

district library for the poor students preparing for the competition examinations! | स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे जिल्हा ग्रंथालय ठरले दीपस्तंभ!

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे जिल्हा ग्रंथालय ठरले दीपस्तंभ!

Next


अकोला : बेरोजगारीची समस्या वाढत आहे. शिक्षक भरती बंद आहे. सरकारी कंपन्यांचे खासगीकरण झाले. अशा परिस्थितीत शासकीय नोकरीच पर्याय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा हाच एकमेव आशेचा किरण दिसतो; परंतु त्यातही विद्यार्थ्यांसमोर अडचण आहे, ती आर्थिक बाबींची. स्पर्धा परीक्षेचे महागडे क्लास लावण्याइतपत परिस्थिती नसणाºया विद्यार्थ्यांसाठी जिल्हा ग्रंथालय दीपस्तंभ ठरत आहे. जिल्हा ग्रंथालयाच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार झाले आहे.
अलीकडच्या काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षा (एमपीएससी) देणाºया विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. शहरापेक्षा ग्रामीण विद्यार्थ्यांचा एमपीएससीकडे कल अधिक आहे; परंतु त्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया खासगी शिकवणी वर्गांचे हजारो रुपये शुल्क, रूम, भोजनाचा खर्च शेतकरी, गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना परवडत नाही. अशा परिस्थितीत स्वयंअध्ययनाशिवाय विद्यार्थ्यांसमोर पर्याय नसतो; परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नामवंत लेखकांची पुस्तके, ताज्या घडामोडींची माहिती देणारी पुस्तके आणायची कोठून, या पुस्तकांची किंमतसुद्धा हजारो रुपयांच्या घरात. एवढी महागडी पुस्तके खरेदी करण्यासाठी पैसा आणायचा कोठून, आदी प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत होते. या प्रश्नांवर त्यांना एकच उत्तर सापडले, ते म्हणजे जिल्हा ग्रंथालय. जिल्हा ग्रंथालयाच्या अभ्यासिकेमध्ये सद्यस्थितीत दोनशे पन्नासच्यावर विद्यार्थी, विद्यार्थिनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. या अभ्यासातून त्यांना हमखास यश मिळतेच. जिल्हा ग्रंथालयाने पीएसआय, एसटीआय, रेल्वे, न्यायालय, बँक, वैद्यकीय महाविद्यालय, परिवहन महामंडळ, मनपा, वन विभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी शासकीय नोकरीत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. जिल्हा ग्रंथालय हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांसाठी करियर घडविणारे मार्गदर्शक ठरले आहे.
२५ हजारांवर स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा खजिना!
जिल्हा ग्रंथालय नुसते वृत्तपत्र, मासिके वाचण्याचे ठिकाण नाही, तर हे विद्यार्थी घडविण्याचे अभ्यास मार्गदर्शन केंद्र बनले आहे. जिल्हा ग्रंथालयामध्ये २५ हजारांवर स्पर्धा परीक्षा पुस्तकांचा खजिना आहे. या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या करियरला, त्यांच्या अभ्यासाला यशस्वी दिशा मिळत आहे.


शासकीय सेवेत रुजू झालेले काही नावे
अभिजित खडसे, नागराज तेलगोटे, शिवशंकर झटाले, श्याम गजभिये, सतीश धनोकार, सचिन गजभिये, श्रीपाल गायकवाड, अमोल साखरकर, नयन मेश्राम, उमेश डोलारे, कीर्तीकुमार डांगे, नीतुराज गवई, प्रशांत जाधव, प्रांजली अवचार, प्रकाश बाहकर, प्रकाश वाकोडे, दीपक इंगळे, शेख शकील, अमोल मानखैर, इमान चौधरी, अजय पहुरकर, मयूर बकाले, प्रदीप भातकुले, तक्षक ओळंबे, सचिन भांबेरे, रूपेश राजुरकर, दीपक कोडापे, उज्ज्वला इटीवाले, राजरत्न डोंगरे, विठ्ठल डांगे, ममता देशमुख, पूजा सेंगर, गिरीश खेते, मुकुंद घुले, अभिजित राळे, पूजा भाकरे, प्रदीप सिरसाट, कविता पाटील, मोनिका भगत, छाया वाहुरवाघ, राहुल चव्हाण, सचिन पांडे, प्रमिता भेले, प्रकाश बागडे, मंगेश नवघरे, महेश धबडगाव यांच्यासह कितीतरी जणांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरी प्राप्त केली.

गत काही वर्षांमध्ये जिल्हा ग्रंथालयाने तीनशेच्यावर बेरोजगार विद्यार्थ्यांना अभ्यासिकेच्या माध्यमातून शासकीय नोकरीची संधी मिळवून दिली. येथील अभ्यासाच्या बळावर शेकडो, शेतकरी, गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शासकीय नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले.
अतुल वानखडे, जिल्हा ग्रंथपाल,
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय.

 

Web Title: district library for the poor students preparing for the competition examinations!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.