सात-बारा ‘अपडेट’मध्ये जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2020 02:35 PM2020-10-12T14:35:36+5:302020-10-12T14:35:46+5:30

Saat-Bara सात-बारा ‘अपडेट’ करण्याच्या कामात जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठयावर आहे.

The district is on the threshold of one hundred percent in Saat Bara 'updates'! | सात-बारा ‘अपडेट’मध्ये जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर!

सात-बारा ‘अपडेट’मध्ये जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातील आॅनलाइन सात-बारा अद्ययावत (अपडेट) करण्याचे काम महसूल प्रशासनामार्फत सुरू असून, ३ लाख ६२ हजार १७३ सात-बारापैकी ९ आॅक्टोबरपर्यंत ३ लाख ६१ हजार ३८३ सात-बारा अद्ययावत करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित ७९० सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने आॅनलाइन सात-बारा ‘अपडेट’ करण्याच्या कामात जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठयावर आहे.
आॅनलाइन सात-बारा अद्ययावत अद्ययावत करण्यासाठी महसूल प्रशासनामार्फत दरवर्षी सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे काम करण्यात येते. त्रुटीची दुरुस्ती आणि ‘डाटा साइन’ केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अद्ययावत सात-बारा उपलब्ध करून देण्यात येतो. जिल्ह्यात एकूण ३ लाख ६२ हजार १७३ सात-बारा असून, त्यापैकी ९ आॅक्टोबरपर्यंत ३ लाख ६१ हजार ३८३ सात-बारा ‘डेटा साइन’ करण्यात आले आहेत. उर्वरित ७९० सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे काम जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयस्तरावर सुरू आहे. त्रुटी दुरुस्तीचे काम पूर्ण करून लवकरच या सात-बाराचा ‘डाटा साइन’ करण्यात येणार आहे. त्यामुळे आॅनलाइन सात-बारा ‘अपडेट’ करण्याच्या कामात अकोला जिल्हा शंभर टक्क्याच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यातील एकूण ३ लाख ६२ हजार १७३ आॅनलाइन सात-बारापैकी ३ लाख ६१ हजार ३८३ सात-बाराचा डाटा साइन करण्यात आला आहे. उर्वरित सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार सात-बारामधील त्रुटी दुरुस्तीचे काम सुरू आहे.
- संजय खडसे, निवासी उपजिल्हाधिकारी

Web Title: The district is on the threshold of one hundred percent in Saat Bara 'updates'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.