जिल्ह्यात आजपासून मिळणार आॅनलाइन सातबारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 01:55 AM2017-08-01T01:55:53+5:302017-08-01T01:57:08+5:30

अकोट: अकोट तहसील अंतर्गत ५० हजार १०८ सातबारा संगणकीकृत करण्यात आले आहेत. या सातबाराचे अचूक व अंतिम तपासणी करण्यात आली असून, १५ आॅगस्टपासून डिजिटल स्वाक्षरी असलेला संगणकीकृत सातबारा शेतकºयांना मिळणार आहे. त्यामुळे आता सातबाराकरिता शेतकºयांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाही.

From the district today will get online! | जिल्ह्यात आजपासून मिळणार आॅनलाइन सातबारा!

जिल्ह्यात आजपासून मिळणार आॅनलाइन सातबारा!

Next
ठळक मुद्देअकोट तालुक्यात ५० हजार सातबारांचे झाले संगणकीकरणबार्शीटाकळी तालुक्यात १५९ गावांमध्ये वितरणमूर्तिजापुरात १३ गावांमध्ये उद्या वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट: अकोट तहसील अंतर्गत ५० हजार १०८ सातबारा संगणकीकृत करण्यात आले आहेत. या सातबाराचे अचूक व अंतिम तपासणी करण्यात आली असून, १५ आॅगस्टपासून डिजिटल स्वाक्षरी असलेला संगणकीकृत सातबारा शेतकºयांना मिळणार आहे. त्यामुळे आता सातबाराकरिता शेतकºयांना शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागणार नाही.
अकोट तालुक्यात एकूण १८५ गावे असून ६४ हजार ८५१ शेतकरी खातेदार आहेत. या शेतकºयांच्या नावावर एकूण ५० हजार १०८ सातबाराची नोंद आहे. या शेतकºयांना शेतीच्या कामापासून तर बँकेच्या कामापर्यंत सातबाराकरिता तलाठ्यांच्या मागे फिरावे लागत होते; परंतु शासनाने आॅनलाइन संगणकीकृत सातबारा उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम राबविला. त्यानुसार महसूल विभागाने सर्व सातबारे संगणकीकृत करून महाभुलेख व आपले सरकार या शासकिय पोर्टलवर उपलब्ध करून दिले. त्यानंतर या सातबाºयांचा चावडी वाचन विशेष मोहीम राबविण्यात आली. ७/१२ ची अचूक तपासणी करण्यात आली. त्यावर त्रुटी आक्षेप मागविण्यात आले. त्यानंतर सातबाराची दुरुस्ती व तपासणी करून अचूक असा डिजिटल स्वाक्षरीसह आॅनलाइन सातबारा तयार करण्यात आला आहे. आता या सातबारा वर तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांची डिजिटल स्वाक्षरी राहणार आहे. हा सातबारा खातेदाराला केव्हाही मोफत पाहता येईल. सातबारा काढण्याकरिता २३ रुपये शासकीय फी आकारण्यात आली आहे, तर सेतू केंद्रातून हा सातबारा २५ रुपयांमध्ये मिळणार आहे. या संगणकीकृत सातबाराच्या जनजागृतीकरिता जिल्हा प्रशासनातर्फे विविध कार्यक्रम राबविल्या जाणार आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्येसुद्धा संगणकीकृत सातबाराचे फायदे या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या डिजिटल स्वाक्षरीसह संगणकीकृत सातबाराची पार्श्वभूमी, तपासणी व वितरण आदी बाबतची सविस्तर माहिती ३१ जुलै रोजी उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. तालुक्यात एकूण ५० तलाठी सांझे आहेत तर ४२ तलाठी व ६ मंडळ अधिकारी कार्यरत असून, डिजिटल स्वाक्षरी सातबाराचे १५ आॅगस्ट रोजी ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात आल्यानंतर तो उपलब्ध होणार आहे.

बार्शीटाकळी तालुक्यात १५९ गावांमध्ये वितरण
बार्शीटाकळी: बार्शीटाकळी तालुक्यातील १५९ गावांमधील आॅनलाइन सातबारांचे वितरण १ आॅगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे.
बार्शीटाकळी तालुक्यातील १५९ गावांमधील संगणक सातबाराचे चावडीवाचन व तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी केलेल्या फेरतपासणीमध्ये एकूण ८३२ त्रुटी आढळून आल्या. या सर्व गावांचे संगणक सातबारा दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सदरहू गावांच्या आॅनलाइन सातबारा वितरणाची कार्यवाही १ आॅगस्टपासून करण्यात येणार आहे. सदरहू आॅनलाइन संगणक सातबारा नागरिकांना आपले पोर्टलद्वारे, महा-ई-सेवा केंद्राद्वारे, तलाठ्यामार्फत उपलब्ध होणार आहेत.

मूर्तिजापुरात १३ गावांमध्ये उद्या वितरण
मूर्तिजापूर: मूर्तिजापूर तालुक्यातील १३ गावांमधील आॅनलाइन सातबारांचे वितरण २ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते महालक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
मूर्तिजापूर तालुक्यातील एकूण १६६ गावांमधील आॅनलाइन सातबारांची फेरतपासणी तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकाºयांमार्फत पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी धामोरी बु., धामोरी खुर्द, सैदापूर, गोपाळपूर, मीरापूर, उमई, औरंगपूर, साखरी, धानोरा वैद्य, किन्ही, फणी, शेणी, अटकळी या १३ गावांमधील संगणक सातबारा दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सदरहू गावांमधील आॅनलाइन सातबारा वितरणाची कार्यवाही अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते २ आॅगस्ट रोजी महालक्ष्मी मंगल कार्यालयात विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

४६ हजार सातबारा झाले आॅनलाइन
बाळापूर: तालुक्यातील १०३ गावातील ७ महसुली मंडळाच्या माध्यमातून ४६ हजार ६६५ सातबारा आॅनलाइन करण्यात आले आहेत. तालुक्यातील सर्व महा ई-सेवा केंद्र, गावातील तलाठी यांच्याकडे दाखले मिळणार आहे. या योजनेला शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. तालुक्यातील अभिलेखागार कक्षामध्ये उपलब्ध लेखाभिलेख, अत्यंत जुने व जीर्ण अभिलेखाचे स्कॅनिंग काम पूर्ण करण्यात आले आहे. शासकीय दस्तावेज आता १५ आॅगस्टपासून शेतकरी, नागरिक यांना घरबसल्या मोबाइल व सर्व महा ई-सेवा केंद्राद्वारे उपलब्ध होार आहे. या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा, वेळ व पैशांची बचत होणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार दीपक पुंडे यांनी सांगितले.

Web Title: From the district today will get online!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.