प्रशिक्षित मनुष्यबळाने वाचविली जिल्ह्याची लस; वेस्टेजचे प्रमाण शून्य टक्के!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:18 AM2021-09-13T04:18:56+5:302021-09-13T04:18:56+5:30

काय आहे एडी सीरिंज? एडी सीरिंज ही ऑटो डिसेबल आहे. म्हणजेच या सीरिंजचा एकदा वापर केल्यानंतर ती लॉक हाेते. ...

District vaccines saved by trained manpower; Zero percent waste! | प्रशिक्षित मनुष्यबळाने वाचविली जिल्ह्याची लस; वेस्टेजचे प्रमाण शून्य टक्के!

प्रशिक्षित मनुष्यबळाने वाचविली जिल्ह्याची लस; वेस्टेजचे प्रमाण शून्य टक्के!

Next

काय आहे एडी सीरिंज?

एडी सीरिंज ही ऑटो डिसेबल आहे. म्हणजेच या सीरिंजचा एकदा वापर केल्यानंतर ती लॉक हाेते. त्याचा पुन्हा वापर करणे शक्य नाही. त्यामुळे ही सीरिंज पूर्णत: सुरक्षित आहे.

एक लाखापेक्षा जास्त साठा उपलब्ध

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये एडी सीरिंजचा तुटवडा भासत असला, तरी जिल्ह्यात सद्य:स्थितीत एडी सीरिंजचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात सद्य:स्थितीत सुमारे एक लाखापेक्षा जास्त एडी सीरिंज उपलब्ध आहेत.

दररोज लागतात सात हजार सीरिंज

जिल्ह्यात दररोज सरासरी सात ते आठ हजार लोकांचे लसीकरण केले जात आहे. त्यानुसार, दररोज सात ते आठ हजार एडी सीरिंजचा वापर केला जात असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. वेस्टेजचे प्रमाण शून्य टक्क्यांवर असल्याने सीरिंजही वेस्टेज जात नाही. त्यामुळे उपलब्ध लसीमध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण शक्य होत आहे.

जिल्ह्यात एडी सीरिंजचा तुटवडा नाही. लस पुरवठ्याचे प्रमाण वाढले आहे. लसीकरण मोहिमेंतर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी वर्षानुवर्षे लसीकरणाच्या कामात असल्याने ते पूर्णत: प्रशिक्षित आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लसीच्या वेस्टेजचे प्रमाणही नाहीच्या बरोबर आहे.

डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला.

Web Title: District vaccines saved by trained manpower; Zero percent waste!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.