दुष्काळी परिस्थितीची ‘सीएम’ घेणार जिल्हानिहाय माहिती

By admin | Published: December 4, 2015 03:04 AM2015-12-04T03:04:48+5:302015-12-04T03:04:48+5:30

विदर्भातील दहा जिल्ह्यातील समस्यांचा अधिका-यांकडून घेणार आढावा.

District wise information for 'CM' of drought situation | दुष्काळी परिस्थितीची ‘सीएम’ घेणार जिल्हानिहाय माहिती

दुष्काळी परिस्थितीची ‘सीएम’ घेणार जिल्हानिहाय माहिती

Next

संतोष येलकर / अकोला : विधिमंडळाच्या नागपूर येथील अधिवेशनादरम्यान, विदर्भातील दहा जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्या व दुष्काळी परिस्थितीची जिल्हावार माहिती मुख्यमंत्री (सीएम) देवेंद्र फडणवीस घेणार आहेत तसेच जिल्हानिहाय समस्यांचा आढावादेखील ह्यसीएमह्णकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी ७ डिसेंबरपासून जिल्हानिहाय अधिकार्‍यांच्या बैठका बोलविण्यात आल्या आहेत. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू हो त आहे. या पृष्ठभूमीवर विदर्भातील वर्धा, यवतमाळ, भंडारा, अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशिम, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या दहा जिल्ह्यां तील शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळी परिस्थितीची जिल्हावार माहिती आणि जिल्हानिहाय समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ ते २५ डिसेंबर दरम्यान संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी व अधिकार्‍यांच्या बैठका घेणार आहेत. या बैठकांमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांतील विविध समस्या, जलयुक्त शिवार योजना, शेतकर्‍यांना कर्जमाफी, कर्जाचे पुनर्गठण व चालू वर्षात लाभार्थी शेतकर्‍यांना कर्जाचे वि तरण, अपूर्ण जलसिंचन प्रकल्पांची कामे, जलाशयांमधील उपलब्ध पाणी व त्याचे नियोजन, दुष्काळी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेल्या गहू, तांदूळाचा पुरवठा, तूर डाळीच्या वाढत्या किम ती, जप्त केलेला साठा व भाव नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उ पाययोजना, कृषिपंपांसाठी वीजपुरवठा व पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या कृषिपंपांच्या वीज जोडण्या, धडक सिंचन विहीर योजनांतर्गत कामे, रोहयो अंतर्गत कामे व त्यावरील मजूर उपस्थिती आणि कामांचे नियोजन, टंचाई परिस्थिती, शेती पिकांचे नुकसान तसेच शेतकरी आत्महत्या प्रकरणांचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत.

Web Title: District wise information for 'CM' of drought situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.