जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:25 PM2020-02-28T14:25:26+5:302020-02-28T14:26:57+5:30

गत दोन वर्षांपासून पाणीपट्टीचे १कोटी ९लाख ८५ हजार रुपयांचे देयक थकीत आहेत.

District woman hospital water supply stopped | जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा ठप्प!

जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा ठप्प!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने जिल्हा स्त्री रुग्णालयाचा पाणी पुरवठा बंद केल्याने येथील प्रसूतीची सेवा प्रभावित झाली आहे. गत वर्षभरापासून येथे सीझरियनचे प्रमाण वाढल्याने परिस्थिती गंभीर होत असून, रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी याच प्रकारे जीएमसीतील पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे गत दोन वर्षांपासून पाणीपट्टीचे १कोटी ९लाख ८५ हजार रुपयांचे देयक थकीत आहेत. देयक न भरल्याने महापालिकेच्या जलप्रदाय विभागाने पाच दिवसांपूर्वीच येथील पाणी पुरवठा खंडित केला होता.
त्यामुळे येथील पाण्याची गरज सहा बोअरच्या साहाय्याने भागविण्यात आली; मात्र यातील एक बोअर जळाल्याने येथील पाण्याचे संकट वाढले आहे. मध्यंतरी मार्च २०१९ मध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासनाने महापालिकेला २० लाखांचे देयक अदा केले होते.


थकीत देयकामुळे महापालिकेने पाणी पुरवठा खंडित केला आहे. बोअरच्या साहाय्याने पाण्याची गरज भागविण्यात येत असली तरी, उन्हाळा पाहता पाण्याची आवश्यकता जास्त आहे. महापालिका प्रशासनासोबत बोलणे सुरू असून, लवकरच हा प्रश्न मार्गी काढू.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला.

Web Title: District woman hospital water supply stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.