जिल्ह्याचा पारा घसरला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:17 AM2021-04-12T04:17:15+5:302021-04-12T04:17:15+5:30
अकोला : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील तापमानात सतत बदल होत आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ...
अकोला : यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील तापमानात सतत बदल होत आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या तापमानात घट होत आहे. रविवारी जिल्ह्यात ३७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आणखी दोन दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
----------------------------------------------------
भुईमूग उत्पादनात वाढ होण्याची शक्यता
अकोला : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. रब्बीतही अवकाळीने फटका दिला. आता उन्हाळी पिकावर शेतकऱ्याची मदार असून उन्हाळी भुईमूग पिकाचे उत्पादन चांगले होईल अशी शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
------------------------------------------------------
बोंडअळीवर व्हावी ठोस उपाययोजना
अकोला : खरिपात बोंडअळीने शेतकरी त्रस्त झाले होते. त्यामुळे कपाशीचे उत्पन्न अर्ध्यावर आले. शेतकऱ्यांकडून बोंडअळीवर उपाययोजना करूनही काही फरक पडत नाही. याकरिता शासनाने ठोस उपाययोजना कराव्या अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे.
-------------------------------------------------------
शाळांमध्ये फी वसूल करण्याची धूम सुरू
अकोला : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय झाल्यामुळे शाळांनी फी वसूल करण्याचे अभियान सुरू केले आहे. विशेषकरून खासगी व्यवस्थापनांच्या शाळांनी पालकांना फोन व इतर माध्यमांद्वारे संदेश पाठवून यावर्षीची पूर्ण फी भरण्याची विनंती केली आहे. मुळात वर्गच न भरल्याने फी कशाची, असा पालकांचा प्रश्न आहे; परंतु शाळा व्यवस्थापन ते ऐकायला तयार नाही.