जिल्हय़ांतर्गत बदल्यांबाबत संभ्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 01:39 AM2017-09-26T01:39:34+5:302017-09-26T01:39:41+5:30

अकोला : जिल्हय़ात सध्या जिल्हय़ांतर्गत बदलीचे वारे वाहत  आहेत. वेगवेगळय़ा संवर्गातील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी  वेगवेगळी मुदत देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक अर्ज  भरण्यापासून वंचित राहत आहेत. एकंदरित जिल्हय़ांतर्गत  बदली प्रक्रियेबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. या  गोंधळामुळे जिल्हय़ांतर्गत बदली करण्यात आलेल्या शिक्षकांची  यादीसुद्धा प्रकाशित करण्यात आलेली नाही.  

Disturbance under the transition of the district! | जिल्हय़ांतर्गत बदल्यांबाबत संभ्रम!

जिल्हय़ांतर्गत बदल्यांबाबत संभ्रम!

Next
ठळक मुद्देसंगणकीय प्रणालीच्या माध्यमातून बदली  ट्रान्सफर पोर्टलमध्ये भरली जातेय चुकीची माहिती!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ात सध्या जिल्हय़ांतर्गत बदलीचे वारे वाहत  आहेत. वेगवेगळय़ा संवर्गातील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी  वेगवेगळी मुदत देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक अर्ज  भरण्यापासून वंचित राहत आहेत. एकंदरित जिल्हय़ांतर्गत  बदली प्रक्रियेबाबत शिक्षकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. या  गोंधळामुळे जिल्हय़ांतर्गत बदली करण्यात आलेल्या शिक्षकांची  यादीसुद्धा प्रकाशित करण्यात आलेली नाही.  
अवघड क्षेत्रातील शिक्षकांनी संवर्ग-३ चा अर्ज भरण्यासाठी २४  सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती; परंतु अर्ज भरताना त्यात तांत्रिक  अडचणी येत असल्यामुळे अनेक शिक्षक अर्ज भरण्यापासून  वंचित राहिले. त्यामुळे ही मुदत सोमवार सकाळी ११ वाजेपर्यंत  देण्यात आली होती. तसेच संवर्ग ४ मध्ये येणार्‍या शिक्षकांमध्ये  २५ सप्टेंबर सायंकाळी ७ वाजेपासून अर्ज भरण्यासाठी लॉगिन  उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून  समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या पदांची व शाळेत  असणार्‍या रिक्त पदांची माहिती कशी भरावी, हे शिक्षकांना न  समजल्यामुळे ट्रान्सफर पोर्टलमध्ये ही माहिती चुकीच्या पद्धतीने  भरली जात आहे. त्यामुळे समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या  पदामध्ये येणार्‍या संवर्ग-४ मधील शिक्षकांच्या यादीमध्ये बदल  झाला आहे. शाळेत रिक्त जागा असूनही जर आपण  समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या पदामध्ये घोषित झालेल्या  यादीत येत असाल, तर अशा शिक्षकांनाही बदली होण्याची धास् ती आहे. प्रथमच संगणक प्रणालीद्वारे बदलीची प्रक्रिया होत  असल्याने, अनेक शिक्षकांना अर्ज भरण्याची माहिती नाही.  त्यामुळे अर्जात चुका होत आहेत. 

पती-पत्नी एकत्रीकरणाचा शिक्षकांना लाभ 
संवर्ग-४  मध्ये अर्ज करताना पती-पत्नी शिक्षकांनी एकमेकां पासून ३0 कि.मी. अंतरामध्येच बदली होण्यासाठी  जोडीदाराविषयीची माहिती नमूद करावी. पती-पत्नी दोघेही जि. प. शाळेत शिक्षक असतील व संवर्ग-१, संवर्ग-२ यांनी  समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाच्या पदामुळे दोघेही संवर्ग-४  मध्ये येत असतील तरच त्यांना या सुविधेचा लाभ मिळेल. बदली  प्रक्रिया ही संगणक प्रणालीद्वारे होणार आहे. संवर्ग-४ मध्ये  येणार्‍या शिक्षक पती-पत्नींना ३0 कि.मी. अंतराच्या आत  ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत; परंतु जागा उपलब्ध  असल्या तरच त्यांना लाभ मिळेल. ज्यांना पती-पत्नी  एकत्रीकरणाचा लाभ घ्यायचा नसेल, त्यांनी स्वतंत्र अर्ज भरावा.  जि.प. शाळेचा शिक्षक नसल्यास पती-पत्नी एकत्रीकरणाचा  लाभ मिळणार नाही.

चुकीची माहिती भरणार्‍या शिक्षकांवर कारवाई
जिल्हय़ांतर्गत बदली अर्ज भरताना, ज्या शिक्षकांनी जाणीव पूर्वक चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल करण्याचा  प्रयत्न केला. अशा शिक्षकांवर  कारवाई करून त्यांच्या बदल्या  थांबवण्यात येणार आहेत, असा इशारा शासनाद्वारे देण्यात आला  आहे. 

जिल्हय़ांतर्गत बदली प्रक्रियेसाठी शिक्षक ऑनलाइन अर्ज भरीत  आहे; परंतु संवर्ग १ ते ४ मधील किती शिक्षकांनी अर्ज केले. हे  अद्याप कळू शकले नाही. संवर्ग ४ मधील शिक्षकांचे अर्ज भरणे  झाल्यानंतरच शिक्षकांच्या यादीसंदर्भात चित्र स्पष्ट होईल.  पहिल्यांदाच संगणक प्रणालीद्वारे बदलीची प्रक्रिया होत  असल्याने, शिक्षकांमध्ये थोडीबहुत गोंधळाची स्थिती आहे. 
- प्रशांत दिग्रसकर, 
शिक्षणाधिकारी, प्राथमिक

Web Title: Disturbance under the transition of the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.