प्रभाग रचनेचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे!

By admin | Published: September 13, 2016 03:09 AM2016-09-13T03:09:20+5:302016-09-13T03:09:20+5:30

निवडणूक आयोगाच्या मान्यतेची प्रतीक्षा

Division wise Commissioner of ward structure report! | प्रभाग रचनेचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे!

प्रभाग रचनेचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे!

Next

अकोला, दि. १२: चार सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे महापालिका क्षेत्राची हद्दवाढ गृहित धरून प्रभाग पुनर्रचना करण्यात आली आहे. यामध्ये २0 प्रभागांचा समावेश असून, ८0 नगरसेवकांची संख्या निश्‍चित झाली आहे. सदर अहवाल प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे सादर केला असून, विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर राज्य निवडणूक आयोगाची अंतिम मंजुरी मिळवावी लागणार आहे.
राज्य शासनाने एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभागरचना लागू केली. महापालिकेची सदस्य संख्या विचारात घेऊन प्रभागांची पुनर्रचना करण्याचे शासनाचे निर्देश होते. सर्व प्रभागात चार सदस्य होत नसल्यास एक प्रभाग ३ किंवा ५ सदस्यांचा अथवा दोन प्रभाग ३ सदस्यांचे याप्रमाणे रचना करण्याची सूचना होती. त्यानुसार मनपाच्या स्तरावर प्रभाग रचना करण्यात आली. महापालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांची लोकसंख्या, क्षेत्रफळ गृहित धरून प्रभाग रचनेचा प्रारूप अहवाल तयार झाल्यानंतर मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला. विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर पुन्हा राज्य निवडणूक आयोगाची अंतिम मंजुरी घ्यावी लागेल.

Web Title: Division wise Commissioner of ward structure report!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.