दिव्यांग सोशल फाउंडेशनची महिलांसाठी आरोग्य कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:16 AM2021-05-30T04:16:58+5:302021-05-30T04:16:58+5:30

मासिक पाळी दिनानिमित्त आयोजित या कार्यशाळेत वाशीम येथील डॉ. मंजुश्री जांभरुणकर व अनामिका देशपांडे यांनी कळी उमलताना हा महिला ...

Divyang Social Foundation's Health Workshop for Women | दिव्यांग सोशल फाउंडेशनची महिलांसाठी आरोग्य कार्यशाळा

दिव्यांग सोशल फाउंडेशनची महिलांसाठी आरोग्य कार्यशाळा

Next

मासिक पाळी दिनानिमित्त आयोजित या कार्यशाळेत वाशीम येथील डॉ. मंजुश्री जांभरुणकर व अनामिका देशपांडे यांनी कळी उमलताना हा महिला आरोग्य विषयक कार्यक्रम प्रस्तुत केला. सोशल मीडियाद्वारे आयोजित या कार्यक्रमात दिव्यांग महिलांनी आपली उपस्थिती नोंदवली. मासिक पाळी दरम्यान, महिलांना उद्भवणाऱ्या समस्या त्यावरील अचूक उपाय या कार्यक्रमात सांगण्यात आले. विशेष म्हणजे दिव्यांग महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांना उत्तरे देऊन मार्गदर्शन करण्यात आले. मासिक पाळी विषयी गैरसमज व अंधविश्वास या कार्यक्रमातून दूर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा गुंटीवार, सूत्रसंचालन अनामिका देशपांडे, तर आभार प्रदर्शन राजश्री नाथक यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रसाद झाडे, श्रीकांत कोरडे, पूजा देशमुख, हिमांशू निमकर्डे, प्रा. अरविंद देव व प्रीती झाडे यांनी सहकार्य केले.

Web Title: Divyang Social Foundation's Health Workshop for Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.