आकाशात चार दिवस ‘उल्कांची’ दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 10:54 AM2020-11-09T10:54:51+5:302020-11-09T10:56:41+5:30

Meteors in the sky for four days १७, १८, १९ नोवहेंबरच्या पहाटे उल्का वर्षावाची शक्यता जास्त राहील

Diwali of 'Meteors' in the sky for four days | आकाशात चार दिवस ‘उल्कांची’ दिवाळी

आकाशात चार दिवस ‘उल्कांची’ दिवाळी

Next
ठळक मुद्देसिंह तारकासमूहातून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे.उल्का वर्षाव टेम्पलटटल या धूमकेतूच्या अवशेषामुळे होतो.

अकाेला : प्रकाशाच्या उत्सव असलेल्या दिवाळीत सर्व परिसर प्रकाशाने उजळून जात असताेच; मात्र या वर्षी नभांगणही उजळणार आहे. १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान सिंह तारकासमूहातून मोठ्या प्रमाणात उल्का वर्षाव होणार आहे. या वर्षावाचे ‘लिओनिड्स’ हे प्रसिद्ध नाव आहे.

उल्कासंदर्भातील अशा अंधश्रध्देला खगोलीय शास्त्रात कोठेही आधार नाही. सिंह तारकासमूहातून होणारा हा उल्का वर्षाव टेम्पलटटल या धूमकेतूच्या अवशेषामुळे होतो. हा धूमकेतू ३३ वर्षांनी सूर्याला भेट देतो. या खगोलीय घटनेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. उल्का वर्षाव अगदी साध्या डोळ्यांनी मध्यरात्रीनंतर घराच्या गच्चीवरून किंवा शहराबाहेरून अंधारात पाहता येईल. सर्व खगोलप्रेमींनी व जिज्ञासूंनी उल्का वर्षावाचे विलोभनीय दृश्य अवश्य बघावे, असे आवाहन खगाेल अभ्यासकांनी केले आहे.

 

अंधाऱ्या रात्री आकाशाचे निरीक्षण करताना एखादे वेळी क्षणार्धात एखादी प्रकाश रेषा चमकून जाताना दृष्टीस पडते. या घटनेस तारा तुटला, असे म्हटले जाते. खरे पाहता ही प्रकाशरेषा दुसऱ्या ताऱ्याची असते. ती एक आकाशात घडणारी खगोलीय घटना आहे. तारा कधीही तुटत नसतो. या घटनेला उल्का वर्षाव असे म्हणातात. १७, १८, १९ नोवहेंबरच्या पहाटे उल्का वर्षावाची शक्यता जास्त राहील. उल्का वर्षावाची तीव्रता निश्चित , वेळ या गोष्टी खात्रीने सांगता येत नाही. निरीक्षणाची तयारी आणि सोशिकता असलेल्यांनी उल्का पाहण्याचा प्रयत्न करावा. धुमकेतू सूर्याला प्रदक्षिणा घालून जात असताना त्यातील काही भाग मोकळा होतो, हे धूमकेतूने मागे टाकलेला अवशेष होय हा उल्का एखाद्या तारका समूहातून येत आहे, असे वाटते. तासाला ६० किंवा त्याहून अधिक उल्का आकाशातील एखादा भागातून पडत असतील, तर त्यास उल्का वर्षाव असे म्हणतात.

 

मघा नक्षत्रातून उल्कावर्षाव हाेणार आहे. हे नक्षत्र जेव्हा आकाशाच्या मध्यावर येईल तेव्हा उल्कांचा वेग वाढेल. आपल्या परिसरात रात्री १२ नंतरच उल्का दिसून येतील; मात्र पहाटे ४ ते ५ ३० वाजताच्या दरम्यान उल्का दृष्टीस येतील. साध्या डाेळ्यांनीसुद्धा आपणास उल्का वर्षाव पाहता येईल.

- प्रभाकर दाेड, खगाेल अभ्यासक, अकाेला

Web Title: Diwali of 'Meteors' in the sky for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.