डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देऊ नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:19 AM2021-09-13T04:19:00+5:302021-09-13T04:19:00+5:30

शासकीय विश्रामगृह येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, ...

Do not give medicine without a doctor's prescription! | डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देऊ नका !

डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देऊ नका !

Next

शासकीय विश्रामगृह येथे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सागर तेरकर, बुलडाणा येथील औषध प्रशासन सहायक आयुक्त अशोक बरडे, अन्न सुरक्षा अधिकारी कोकडकर, रावसाहेब वाकडे आदी उपस्थित होते. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कामाचा आढावा घेत जिल्ह्यात डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय रुग्णास औषध दिल्या जाऊ नये, याबाबत प्राधान्याने अंमलबजावणी करण्याची दक्षता घेण्याचे निर्देशही अन्न व औषध प्रशासनमंत्री डाॅ. शिंगणे यांनी यावेळी दिले.

भेसळ करणाऱ्यांवर

दंडात्मक कारवाई करा!

सध्या सणासुदीचे दिवस असून, सण आणि उत्सवाच्या काळात भेसळ व रासायनिक प्रक्रिया केलेल्या मिठाई, फरसाण, खाद्य वस्तू विक्री केल्या जातात. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. तसेच खाद्यपदार्थांची नियमित तपासणी करून भेसळ होत नसल्याची खात्री करण्याचे निर्देश डाॅ. शिंगणे यांनी अन्न व औषध प्रशासनाला दिले. तसेच पथक गठित करून जिल्ह्यात गुटखा विक्री करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

........................................

औक्सिजन, औषधांचा

मुबलक साठा तयार ठेवा !

जिल्ह्यातील औषधसाठा व ऑक्सिजन उपलब्धतेबाबतचा आढावा अन्न व औषध प्रशासनमंत्र्यांनी घेतला. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सतर्क राहून ऑक्सिजन व औषधांचा मुबलक साठा तयार ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनमंत्री डाॅ. शिंगणे यांनी दिले.

...........................फोटो.............................................

Web Title: Do not give medicine without a doctor's prescription!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.