पाणी फाउंडेशनच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

By Atul.jaiswal | Published: May 2, 2018 06:50 PM2018-05-02T18:50:21+5:302018-05-02T18:50:21+5:30

अकोला :- श्रमदान हे श्रेष्ठदान असून पाणी फाउंडेशनच्या कामासाठी वित्तीय किंवा इंधनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली.

Do not let the funds fall short for the water foundation work - Guardian Minister Dr. Ranjit Patil |  पाणी फाउंडेशनच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

 पाणी फाउंडेशनच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही - पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देअकोट तालुक्यातील शहापूर (रूपागड) गावात   पालकमंत्री यांनी हातात फावडे व टोपले घेवून  स्वत: केले श्रमदान. डॉ. रणजीत पाटील यांचे गावातील लोकांनी  वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत केले. वॉटर स्पर्धेत बक्षिस मिळविण्याचा निर्धार या गावातील गावक-यांनी केला असून त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.  

अकोला :- श्रमदान हे श्रेष्ठदान असून पाणी फाउंडेशनच्या कामासाठी वित्तीय किंवा इंधनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. पाणी फाउंडेशनच्या  वॉटर कप स्पर्धेत  प्रथमच सहभागी झालेला अकोट तालुक्यातील शहापूर (रूपागड) गावात  1 मे महाराष्ट्र दिनानिमित्य आयोजीत महाश्रमदान कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी  शहापूरचे सरपंच  सोनाजी बारे,  उपसरपंच श्री पवार, अकोट उपविभागीय अधिकारी उदय राजपूत , तहसिलदार विश्वनाथ घुगे,  तुषार अढावू , चंचल पितांबरवाले, आकाश धुमाळे, कमलेश राठी, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक मनिष महल्ले, समेध खंडारे, आशिष मोहरळे ,परेश गाडगे, महानगर अध्यक्ष डॉ.अशोक कोळंबे, योगेश नाठे, महादेव बकाल, डॉ. लांडे, दिलीप बोचे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          भविष्यात पाणी प्रश्न भिषण होणार आहे. यामुळे पावसाचे पाणी अडविणे व पाणी जिरविणे अत्यंत आवश्यक असून  शहापूर रूपागड हे गाव पंचमहाभुतांनी  व्यापलेले असून या ठिकाणी  पावसाचे  पाणी  डोंगरातून  जोरात येते व ते वाहून जाते त्या पाण्यात अडविण्याचे काम व ते जमिनीत जिरविण्याचे काम शहापूर  रूपागड   गावक-यांनी  केले आहे, ही अत्यंत अभिमानाची  बाब असून  त्याग, संकल्प  व सचोटी असेल  तर कोणतेही काम अशक्य नसल्याचे गावक-यांनी दाखवून   दिले असून याकामी त्यांना पाणी फाउंडेशन व  भूमी फाउंडेशनचे कार्यकर्ते सहकार्य करत आहे. ही अत्यंत कौतूकाची बाब असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

            डॉ. रणजीत पाटील यांचे गावातील लोकांनी  वाजत गाजत मिरवणूक काढून स्वागत केले. गावातील  सुवासिनीनी त्यांना कुकूंम तिलक लावून औक्षण केले. डॉ. रणजीत पाटील यांनी हातात फावडे व टोपले घेवून  हजारो गावकरी   व  जलमित्रांसोबत स्वत:  श्रमदान  केले. व गावक-यांचा उत्साह वाढला. शहापूर  रूपागड  हे गाव  आदिवासी गाव असून सातपूडयाच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावातील जमिन  डोंगराळ असून  सर्व  गावक-यांनी  एकत्र येवून उन्हातान्हात श्रमदान करीत आहे. पाण्यासाठी  गाव पेटून उठले असल्याचे चित्र येथे दिसून येते. या ठिकाणी  सलग समतलचर,  गाळ काढणे,  शेततळे ,दगडी बांध, माती नाला बांध, नाला खोलीकरण आदी जलसंधारणाची कामे श्रमदानातून मोठया प्रमाणात चालू आहेत. पाणी फाउंडेशन वॉटर स्पर्धेत बक्षिस मिळविण्याचा निर्धार या गावातील गावक-यांनी केला असून त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.    

Web Title: Do not let the funds fall short for the water foundation work - Guardian Minister Dr. Ranjit Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.