दुबार पेरणीचे पंचनामे करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:29 AM2017-07-21T01:29:55+5:302017-07-21T01:29:55+5:30

पालकमंत्र्यांचे निर्देश : मूर्तिजापूर येथे कृषी समाधान शिबिर

Do not panic sowing! | दुबार पेरणीचे पंचनामे करा!

दुबार पेरणीचे पंचनामे करा!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर: शेतीच्या चांगल्या उत्पादक क्षमतेसाठी सर्व शेतींची मृदा आरोग्य पत्रिका काढली जाईल. कृषी औजरांसाठी यांत्रिकी बँक स्थापन केली जाईल. पीक विम्याची भरपाई न करणाऱ्या कंपनीवर कारवाई केली जाईल. शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करून खडीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही देत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दुबार पेरणीचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
मूर्तिजापूर येथे आज आयोजित कृषी समाधान शिबिरात ते बोलत होते. यावेळी आमदार हरीश पिंपळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भय्यासाहेब तिडके, नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी भागवत सैंदाने, उपविभागीय कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, मूर्तिजापूरचे तहसीलदार राहुल तायडे, बार्शीटाकळीचे तहसीलदार रवी काळे आदींसह सर्व कृषी विभागासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री म्हणाले की,
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी शासन अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन आपले जीवन सुखी करावे. शेतकऱ्यांच्या अन्य अडचणीही प्राधान्याने सोडविल्या जातील. शेतकऱ्यांचे समाधान हेच शासनाचे ध्येय आहे, त्यामुळेच शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यात प्रथमच अकोला जिल्ह्यात कृषी समाधान शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दुबार पेरणीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना निश्चितपणे अर्थसाह्य दिले जाईल. मागील वर्षी पीक विम्याचे पैसे न देणाऱ्या कंपनीच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करून शेतकऱ्यांना त्यांचे पैसे दिले जातील. जलयुक्तच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी स्वामी समर्थ शेतकरी स्वयंम सहायता शेतकरी बचतगटाच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निधीला ११ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. शेतकरी आत्महत्याग्रस्त बेबीनंदा विश्वनाथ राऊत यांना धनादेश देण्यात आला.
शिबिरात एकूण ९५ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक संजय डागा, कमलाकर गावंडे, नारायण भटकर, भारत भगत, राजेंद्र हंडे, संतोष सारडा, संतोष शर्मा, आरिफभाई, राहुल पाटील, राजू नासणे, राजू सरदार, दिग्विजय गाडेकर, गजानन नाकट, संदीप जळमकर, राहुल गुल्हाने, सचिन देशमुख, हर्षल साबळे, अविनाश यावले, रितीष शाबसकर, आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Do not panic sowing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.