टॅक्स जमा न करणे भोवले; दोन टॉवरला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:39 IST2018-12-19T15:39:40+5:302018-12-19T15:39:56+5:30
अकोला : महापालिका प्रशासनाचा मालमत्ता कर जमा न करणे शहरातील मोबाइल टॉवर कंपनीच्या अंगलट आले. जेटीएल इन्फ्रास्ट्रक्चर नामक कंपनीने ...

टॅक्स जमा न करणे भोवले; दोन टॉवरला कुलूप
अकोला: महापालिका प्रशासनाचा मालमत्ता कर जमा न करणे शहरातील मोबाइल टॉवर कंपनीच्या अंगलट आले. जेटीएल इन्फ्रास्ट्रक्चर नामक कंपनीने मनपाचा तब्बल २ लाख ४७ हजार रुपयांचा कर जमा न केल्यामुळे मंगळवारी कर अधीक्षक विजय पारतवार व त्यांच्या चमूने दोन मोबाइल टॉवरला कु लूप लावण्याची कारवाई केली.
राम नगर येथील मालमत्ताधारक सुरेश पाटील यांच्याकडे भाडेकरू म्हणून जेटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने टॉवर उभारले आहे. या ठिकाणी उभारलेल्या टॉवरच्या मोबदल्यात कंपनीकडे १ लाख ७ हजार रुपये टॅक्स थकीत होता. तसेच व्हीएचबी कॉलनीतील अलकनंदा ढोरे यांच्याकडे भाडेकरू असलेल्या जेटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे १ लाख ३९ हजार रुपये कर थकीत होता. या दोन्ही टॉवरला कुलूप लावण्याची कारवाई कर अधीक्षक विजय पारतवार यांच्या उपस्थितीत जप्ती पथक प्रमुख सै. मुमताज अली, सहा.कर अधीक्षक प्रशांत बोळे, प्रकाश कपले यांसह कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी लहान उमरीस्थित पाटील मार्केटमधील भरत सेठ यांच्याकडे ३५ हजार रुपये कर थकीत असल्याप्रकरणी मनपाने त्यांच्या दिपेन स्टील दुकानाला सील लावण्याची कारवाई केली.