लग्न सोहळे कमी खर्चातच करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:40 AM2021-09-02T04:40:11+5:302021-09-02T04:40:11+5:30
अकोला : लग्न साेहळ्यांमध्ये काळानुरूप बदल झाले आहेत. मात्र, खर्च वाढताच दिसत आहे. येणाऱ्या काळात अंधश्रद्धा कर्मकांडाचे उच्चाटन करून ...
अकोला : लग्न साेहळ्यांमध्ये काळानुरूप बदल झाले आहेत. मात्र, खर्च वाढताच दिसत आहे. येणाऱ्या काळात अंधश्रद्धा कर्मकांडाचे उच्चाटन करून कमीत कमी खर्चात लग्न सोहळे पार पाडणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन पाटील सेवा समितीचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी केले.
अकोला जिल्हा मराठा मंडळ व पाटील सेवा समितीचे चिंतन बैठकीत ते बाेलत होते. मराठा मंडळ कार्यालयात मंडळाचे सचिव प्रकाश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत रमेश पाटील लोणाग्रेकर, प्रा. दत्तात्रय भाकरे, दीपक आखरे, श्रीकांत पागृत, गजानन डिवरे, डिगंबर नवले, केशवराव मुरूमकार आदींनी चर्चेत सहभाग घेतला.
संचालन बबनराव कानकिरड यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. दत्तात्रय भाकरे यांनी केले. यावेळी मंगेश लांडे, रामेश्वर बढे, सुभाष ठाकरे, श्रीकांत पालखडे, रमेश राजाराम वानखडे (महागाव), भुजंगराव रोडे, प्रतिभा काटे यांची उपस्थिती होती.