पॉलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ? ५४० जागांसाठी तब्बल ७२२ अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:19 AM2021-09-19T04:19:39+5:302021-09-19T04:19:39+5:30
सिव्हिल, संगणक शाखेकडे कल विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल पॉलिटेक्निकच्या सिव्हिल, संगणक आणि इलेक्ट्रिक शाखेकडे आहे. कोरोना काळात अनेकांना संगणकावर वर्क ...
सिव्हिल, संगणक शाखेकडे कल
विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल पॉलिटेक्निकच्या सिव्हिल, संगणक आणि इलेक्ट्रिक शाखेकडे आहे. कोरोना काळात अनेकांना संगणकावर वर्क फ्रॉम होम करावे लागले. त्यामुळे संगणक शाखेची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. बांधकाम क्षेत्रात सिव्हिल अभियंत्यांची मागणी आहे. इलेक्ट्रिक शाखेचा अभ्यास केल्यानंतर व्यवसाय किंवा नोकरी करता येते.
जिल्ह्यातील प्रवेश क्षमता
०२
एकूण पॉलिटेक्निक महाविद्यालये
५४०
एकूण प्रवेश क्षमता
७२२
एकूण प्रवेश अर्ज
पॉलिटेक्निक महाविद्यालये
०१ शासकीय
०२ खासगी
महाविद्यालय प्रवेश क्षमता
३०० शासकीय
२४० खासगी
म्हणून पॉलिटेक्निकला पसंती
पॉलिटेक्निक हा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरी लागू शकते किंवा तुम्ही व्यवसायसुद्धा सुरू करू शकता. त्यामुळे पॉलिटेक्निकला प्रवेश घेत आहे.
-सूरज बोराटे, विद्यार्थी
अकरावी, बारावीचे शिक्षण घेण्यापेक्षा पॉलिटेक्निकचा डिप्लोमा करून पुढे अभियांत्रिकीची पदवी घ्यावी. त्यानंतर कुठे ना कुठे नोकरी मिळेल. या आशेने पॉलिटेक्निकला प्रवेश घेत आहे.
-ऋतुजा देवपुजे, विद्यार्थी
गत वर्षीपासून विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निककडे ओढा वाढला आहे. यंदा दहावीचा निकालही अधिक लागल्यामुळे विद्यार्थी पॉलिटेक्निकला पसंती देत आहेत. परंतु, जिल्ह्यात केवळ दोनच पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. त्यामुळे मर्यादित प्रवेश क्षमता आहे.
-प्रा. डॉ. प्रदीप भंसाली, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, मूर्तिजापूर