भाजीपाला घेताना ताेलुन मापून घेता, पेट्राेल घेताना लक्ष देता का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:19 AM2021-03-17T04:19:01+5:302021-03-17T04:19:01+5:30
एकूण पेट्राेलपंप १३ : डिझेल ३५ हजार लिटर, पेट्राेल ५५ हजार लिटर अकाेला : दरवाढीमुळे सर्वांचे लक्ष ...
एकूण पेट्राेलपंप १३ : डिझेल ३५ हजार लिटर, पेट्राेल ५५ हजार लिटर
अकाेला : दरवाढीमुळे सर्वांचे लक्ष सध्या पेट्रोल व डिझेलकडे लागले आहे. आता पेट्रोल, डिझेलचा थेंब अन् थेंब किंमतीचा झाला आहे. पेट्रोल पंपांवर पेट्राेल, डिझेल टाकताना मापात पाप करणाऱ्यांवर वैधमापन शास्त्र यंत्रणेची करडी नजर आहे. त्यामुळे ग्राहकांकडून तक्रार आल्यास त्याची दखल घेत संबंधित पंपावर तपासणी केली जाते अशी माहिती वैधमापन शास्त्र विभागाने दिली आहे. पेट्रोल पंपाच्या ठिकाणी ग्राहक आजही जागरूक नसल्याचे दिसून आले. गेल्या महिन्याभरात पेट्रोलचे दर शंभरीवर आले आहेत तर डिझेलचे दरही ८८ रुपयांवर येऊन ठेपले आहे. या वाढत्या दरांमुळे ग्राहकाचे इंधनाच्या प्रत्येक थेंबाकडे आता लक्ष आहे. त्यात मापात पाप करणाऱ्यांची येथे कमी नाही. एवढे पैसे मोजून आपली फसवणूक होऊ नये, यासाठी प्रत्येक ग्राहक जागरूक होणे गरजेचे आहे. त्याकरिता वैधमापन शास्त्र यंत्रणा कार्यान्वित आहे
गेल्या वर्षभरात जिल्ह्यात जवळपास ६४४ पेट्रोल पंपांची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये नोझलची तपासणी करण्यात आली आहे. ग्राहकांची जागरूक होण्याचे आवाहन वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
तक्रारीचे प्रमाण कमी
१. पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल खरेदी करताना शंका असल्यास पेट्रोल पंपावर पाच लिटरचे प्रमाणित माप उपलब्ध असते. मात्र या मापाचा वापर करण्याबाबत ग्राहक उदासीन आहेत.
२. झिराे दाखविला नाही म्हणून पंपावर अनेक ग्राहक वाद घालतात मात्र प्रत्यक्षात झिराे पाहण्याबाबत दक्ष राहत नाहीत तसेच त्याबाबत लेखी तक्रारही करत नाहीत.
३. आपण दिलेल्या रकमेमध्ये आपल्याला याेग्य पेट्राेल, डिझेल मिळावे ही अपेक्षा चुकीची नाही. त्यामुळे ग्राहकांनी दक्ष राहिले पाहिजे.
काेट
पेट्राेल पंपावर अद्ययावत यंत्रणा बसविलेल्या आहेत. पंपाची नियमित तपासणी केली जाते. ग्राहकांच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नाहीत. शहरातील पेट्राेलपंप चालकांना वेळाेवळी सूचना दिल्या जातात.
नरेंद्र सिंग, सहायक आयुक्त, वैधमापन शास्त्र