डॉक्टर? देता का डॉक्टर? कोरोना काळात केवळ सातच डॉक्टर रुजू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:14 AM2021-06-24T04:14:33+5:302021-06-24T04:14:33+5:30

कोरोना काळातील एकूण नियुक्त्या - ५० शहरी भागातील नियुक्त्या - ३० हजर झाले किती - ५ ग्रामीण भागातील नियुक्त्या ...

Doctor? The doctor gives? Only seven doctors in the Corona period! | डॉक्टर? देता का डॉक्टर? कोरोना काळात केवळ सातच डॉक्टर रुजू!

डॉक्टर? देता का डॉक्टर? कोरोना काळात केवळ सातच डॉक्टर रुजू!

Next

कोरोना काळातील एकूण नियुक्त्या - ५०

शहरी भागातील नियुक्त्या - ३०

हजर झाले किती - ५

ग्रामीण भागातील नियुक्त्या - १०

हजर झाले किती - २

४३ जागा रिक्त

सद्य:स्थितीत कोविडची दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे रुग्णसेवेचा भारही कमी झाला आहे, मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशा परिस्थितीत नियुक्त केलेल्या ५० पैकी केवळ सात डॉक्टरांनी नियुक्ती स्वीकारत रुग्णसेवेला सुरुवात केली. त्यामुळे ४३ जागा रिक्त असल्याची माहिती आहे.

कारणे काय

अनेक डॉक्टरांचा ग्रामीण भागात रुग्णसेवेला नकार असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे काही डॉक्टरांनी ग्रामीण भागात रुग्णसेवेकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे.

शासकीय सेवेच्या तुलनेत खासगी सेवेत मानधन जास्त मिळत असल्याने बहुतांश डॉक्टरांचा ओढा खासगी प्रॅक्टिसकडे आहे. अत्यल्प मानधनामुळे देखील अनेक डॉक्टरांनी शासकीय सेवेत रुग्णसेवा देण्यास नकार दिल्याचे दिसून येते.

Web Title: Doctor? The doctor gives? Only seven doctors in the Corona period!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.