रुग्ण तपासणी न केल्याच्या कारणावरून डॉक्टरला मारहाण

By Admin | Published: July 8, 2017 02:17 AM2017-07-08T02:17:10+5:302017-07-08T02:17:10+5:30

अकोला : मुजफ्फर नगरमधील नातेवाइकाला तपासले नाही म्हणून एका डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. डॉक्टरच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

The doctor was assaulted due to non-examination of the patient | रुग्ण तपासणी न केल्याच्या कारणावरून डॉक्टरला मारहाण

रुग्ण तपासणी न केल्याच्या कारणावरून डॉक्टरला मारहाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : मुजफ्फर नगरमधील नातेवाइकाला तपासले नाही म्हणून एका डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. डॉक्टरच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुजफ्फर नगरातील रहिवासी डॉ. सय्यद फैज रहेमन सय्यद दाऊद हाशमी (५३) यांचा येथे दवाखाना आहे. या दवाखान्यात परिसरातील रुग्ण त्यांच्याकडे तपासणीसाठी येतात. याच परिसरात राहणारा इम्रान कुरेशी, रिजवान कुरेशी, इरफान कुरेशी हे त्यांच्याकडे नेहमी तपासणीसाठी येतात.
रुग्णास व्यवस्थित तपासले नाही, लवकर तपासा या ना त्या कारणावरून सदर तिघे जण डॉक्टरशी वाद घालत. त्यांच्याकडून हा प्रकार दोन ते तीन वेळा झाला; मात्र डॉक्टरने दुर्लक्ष केले. त्यानंतर शुक्रवारी या तिघांनी नातेवाइकाची प्रकृती ठीक नव्हती म्हणून गुरुवारी रात्री त्यांच्याकडे धाव घेतली.
डॉक्टरांनी लवकर दरवाजा उघडला नाही म्हणून त्यांच्यावर या तिघांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर काही वेळात डॉ. सय्यद फैज रहेमन हे दुचाकी क्र. एमएच ३० - ९६८६ ने बाहेर जाण्यासाठी निघाले असता त्यांना इम्रान कुरेशी, रिजवान कुरेशी, इरफान कुरेशी, सोहेल कुरेशी, रफिक कुरेशी या पाच जणांनी डॉक्टरला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी रामदासपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी सदर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था (हिंसक कृत्ये मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध) अधिनियम २०१० नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The doctor was assaulted due to non-examination of the patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.