देशी बीटी कपाशीचे उत्पादन घटले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:11 PM2020-01-13T18:11:09+5:302020-01-13T18:11:16+5:30
कापूस पिकाला या दोन महिन्यात २३ ते २८ डीग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते तथापि ते न मिळाल्याने कपाशीची बोेंड काळी पडली.पात्या,फुले गळाली.
- राजरत्न सिरसाट
अकोला: सुरुवातीला उशिरा आलेला पाऊस आणि फुले, पाती, बोंडाच्या अवस्थेत असताना पडलेल्या अतीपावसामुळे देशी बीटी कपाशीला फटका बसला असून,यावर्षी उत्पादनावर परिणाम झाला आहे. हायब्रीड कपाशी बियाण्यांवर संशोधन करू न डॉ.पंजाबराव देशमुख व स्व.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने (देशी बीटी )बीजी-२ कपाशी हे वाण गतवर्षी शेतकऱ्यांना पेरणीसाठी उपलब्ध करू न दिले आहे.
अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पीकेव्ही हायब्रीड-२ तसेच परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नांदेड-४४ (एनएच-४४) वाणात जनुकीय (बीटी जीन) बदल करू न बीटी वाण विकसित करण्यात आले. (महाबीज)महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाने हे वाण गत वर्षी बाजारात आणले असून,खरीप हंगामात शेतकऱ्यांना ३० हजारावर पकीट उपलब्ध करू न दिले. शेतकºयांनी ही बियाणे पेरणी केली आहे.वºहाडातील दर्यापूर,अकोट भागातील शेतकºयांनी पेरणी केली आहे.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरही पेरणी करण्यात आली तथापि आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात पाऊस सुरू असल्याने या पिकाला सुर्यप्रकाश मिळाला नाही.कापूस पिकाला या दोन महिन्यात २३ ते २८ डीग्री सेल्सिअस तापमानाची गरज असते तथापि ते न मिळाल्याने कपाशीची बोेंड काळी पडली.पात्या,फुले गळाली.
याशिवाय रजत देशी बीटी बियाणेदेखील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर प्रात्यक्षीकासाठी पेरणी करण्यात आले. तथापि,अतिपावसाचा फटका बसल्याने कपाशीची बोंड काळी पडली. काही ठिकाणी अपरिपक्व असतानाच फुलली. परिणामी या प्रात्यक्षीकासाठी घेण्यात आलेल्या देशी बीटी कपाशीवरही परिणाम झाला आहे.
आता गुलाबी बोंडअळीचा प्रकोप
कापूस पिकावर सद्या सर्वत्र गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला असून, प्रत्येक झाडावर हे प्रमाण अधिक आहे.परिणाम उत्पादनावर परिणाम होत आहे.यामुळे अनेक भागातील शेतकºयांना कापूस पीक नांगरण्याची वेळ आली आहे.
बीजी-२ कपाशी बियाणे शेतकºयांना गतवर्षी उपलब्ध करू न दिले होते.तथापि अतिपावसाचा फटका बसल्याने उत्पादन घटले आहे.नांदेड-४४ बीजी-२ चे उत्पादन मराठवाड्यात बºयापैकी आले.आपल्याकडे या बियाण्यांना परवानगी मिळाली नाही.
-एस.एम.पुंडकर
महाव्यवस्थापक (उत्पादन),
महाबीज,अकोला.