घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणारा अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:14 AM2021-06-19T04:14:06+5:302021-06-19T04:14:06+5:30
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैदपुरा परिसरात एका घरातून घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलीस ...
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैदपुरा परिसरात एका घरातून घरगुती गॅसचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शुक्रवारी छापा टाकला. या ठिकाणावरून ०७ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
बैदपुरा येथील रहिवासी अफसर खा इमाम खा (वय ५४ वर्ष) हा घरगुती गॅस सिलिंडरची काळ्याबाजारात अधिक दराने विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून ०७ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी आरोपीविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.