कोरोना लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, नंतर दोन महिने थांबावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:17 AM2021-03-15T04:17:25+5:302021-03-15T04:17:25+5:30

दुसरा डोस घेतल्यानंतर करा २८ दिवसांनी रक्तदान कोणत्याही प्रकारची लस घेतल्यानंतर १४ ते २८ दिवसापर्यंत रक्तदान करू नये, असा ...

Donate blood before getting the corona vaccine, then wait two months | कोरोना लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, नंतर दोन महिने थांबावे लागणार

कोरोना लस घेण्यापूर्वी करा रक्तदान, नंतर दोन महिने थांबावे लागणार

Next

दुसरा डोस घेतल्यानंतर करा २८ दिवसांनी रक्तदान

कोणत्याही प्रकारची लस घेतल्यानंतर १४ ते २८ दिवसापर्यंत रक्तदान करू नये, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात. लसीमध्ये अशक्त विषाणू असतात. त्याचा परिणाम रक्त घेणाऱ्यावर होण्याची शक्यता असते. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनी २८ दिवस रक्तदान करू नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोरोना लसीचे दोन डोस असून, पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यामुळे साधारणपणे दोन महिने रक्तदान करता येत नाही.

कोरोनाची धास्ती असल्यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. साधारणपणे दररोज ४ ते ५ रक्तदाते येतात. कोरोनामुळे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास मर्यादा येत असल्याने इच्छुक रक्तदात्यांनी कोणतीही भीती न बाळगता थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे.

डॉ. अजय जुनघरे, रक्तपेढी प्रमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

आमच्या रक्तपेढीतून प्रामुख्याने थॅलेसिमियाग्रस्तांची गरज भागविली जाते. कुठलेही व्हॅक्सिन घेतल्यानंतर साधारणपणे २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे इच्छूक रक्तदात्यांनी लस घेण्यापूर्वीच रक्तदान करण्याचे नियोजन केले तर रक्तपेढीतील रक्त उपलब्धतेवर त्याचा परिणाम होणार नाही.

नीलेश जोशी, सचिव, हेडगेवार रक्तपेढी, अकोला

आतापर्यंत लसीकरण ३४,४८०

दररोज साधारण लसीकरण २००० ते २५००

शहरातील रक्तपेढ्या १०

Web Title: Donate blood before getting the corona vaccine, then wait two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.